आरोग्य

Health Tips: सफरचंद खा परंतु केव्हा आणि कसे? नाहीतर फायदयाऐवजी होईल नुकसान! वाचा महत्वाची माहिती

Published by
Ajay Patil

Health Tips:- शरीराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आहारापासून ते राहणीमान तसेच तुमचा दैनंदिन जीवनामधील कामाचा बॅलन्स खूप महत्त्वाचा असतो. कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा शरीराच्या आरोग्यावर होत असतो.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहाराचे महत्व अनन्यसाधारण आहे. आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे खूप गरजेचे असते. परंतु यामध्ये देखील आहार घेताना बरीच काळजी घेणे महत्त्वाचे असते. म्हणजेच कोणत्या वेळी काय खावे किंवा कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या आहाराचे सेवन करू नये किंवा कोणत्या आहाराचे सेवन करावे?

याबाबत देखील आपल्याला बरीच काळजी घेणे गरजेचे असते. या अनुषंगाने जर आपण फळांचा विचार केला तर आहारामध्ये फळांचा समावेश करण्याचा आपल्याला डॉक्टर सल्ला देत असतात व यामध्ये सफरचंद खाण्याचा सल्ला देखील डॉक्टरांच्या माध्यमातून बऱ्याचदा दिला जातो.

परंतु सफरचंद खाताना देखील काही गोष्टींची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे असते. नाहीतर फायदा होणे तर दूरच परंतु नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सफरचंद खाताना कोणत्या चुका टाळणे गरजेचे आहे याबाबतीत आहार तज्ञांची देखील काही मते आहेत. तिच आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

 सफरचंद खा परंतु ही घ्या काळजी

 बऱ्याच लोकांना जेवणानंतर गॅस आणि अपचन होण्याच्या समस्या असतात. अशा समस्या असलेल्या व्यक्तींनी सफरचंद खाताना ते रिकामेपोटी खाणे कटाक्षाने टाळावे. अशा व्यक्तींनी जेवण केल्यानंतर साधारणपणे दोन तासांनी सफरचंद खावे.

तसेच बऱ्याच लोकांना दही किंवा दुधासोबत सफरचंद खाण्याची सवय असते. परंतु हे टाळणे गरजेचे आहे. त्यामागील कारण पाहिले तर सफरचंदामध्ये सायट्रिक ऍसिड असते व ते दुधासारख्या किंवा दुग्धजन्य पदार्थांसोबत खाल्ले तर काही विशिष्ट प्रतिक्रिया देऊ शकते

व त्यामुळे ते पचण्याला अडचण होऊ शकते. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आतड्यांवर होऊ शकतो व एवढेच नाही तर दुधासोबत सफरचंद खाल्ल्याने त्वचेशी संबंधित काही धोका देखील वाढू शकतो.

 सफरचंद कापल्यानंतर किती वेळाने खाऊ शकतो?

 आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते किंवा सफरचंद आपण कापतो आणि बाकीचे खातो आणि बाकीचे तसेच ठेवून देतो. परंतु यामध्ये जर आपण पाहिले तर सफरचंद खात असताना ते कापल्यानंतर लगेचच खाणे गरजेचे आहे.

जर सफरचंद कापल्यानंतर लगेच खाल्ले गेले नाही तर त्यावर तांबूस व काळा रंग चढू लागतो व त्यानंतर मात्र आपण त्याचा तो बदललेला रंग पाहून सफरचंद खाऊ शकत नाही. तसेच सफरचंद खाताना ते सोलून खावे.

यामागील कारण पहिले तर अनेकदा विक्रेत्यांच्या माध्यमातून  सफरचंदाचे फळ तेजस्वि, चमकदार दिसण्यासाठी मेण वापरले जाते.

त्यामुळे ते खाण्याआधी स्वच्छ धुऊन घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा आपण मुलाला डब्यामध्ये सफरचंद देतो. अशावेळी डब्यात सफरचंद देत असताना त्यात चिमूटभर मीठ टाकावे. जर असं केले तर सफरचंद पिवळे किंवा तपकिरी होतं नाही.

Ajay Patil