Snake Bite:- सध्या पावसाळ्याचा कालावधी सुरू झाला असून अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजेरी लावलेली आहे. अशा पावसाच्या कालावधीमध्ये सापांसारख्या प्राण्यांची बिळे बुजली जातात व साफ बऱ्याचदा बिळातून बाहेर पडतात व राहण्यासाठी एखाद्या जागेचा आडोसा घेतात व कधीकधी घरात देखील शिरतात.
पावसाच्या कालावधीमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. पावसामुळे सापांचा अधिवास नष्ट झाल्याने ते सुरक्षित जागेचा शोध घेत असतात व असा शोध घेत असताना घरामध्ये एखादी अडगळीची जागा असेल तर त्या ठिकाणी येऊन बसतात.
अशा ठिकाणी चुकून आपण गेलो आणि आपला पाय किंवा धक्का जरी सापाला लागला तरी देखील साप चावण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशी घटना जर घडली तर घाबरून न जाता बरेच लोक मांत्रिकाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु असे न करता लवकरात लवकर वैद्यकीय उपचारांसाठी दवाखाना गाठणे गरजेचे असते. परंतु तोपर्यंत काही प्रथमोपचार यामध्ये महत्त्वाचे ठरतात.
साप चावला तर अशा पद्धतीने करा प्रथमोपचार
बऱ्याचदा साप चावल्यानंतर पटकन वैद्यकीय मदत मिळत नाही किंवा काही अडथळे निर्माण होतात. अशावेळी प्रथमोपचार खूप कामाला येतो व साप चावलेल्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर त्यासाठी प्रथमोपचार करताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अगोदर त्या व्यक्तीला धीर देणे गरजेचे आहे.
त्यानंतर त्याला सर्वप्रथम जमिनीवर झोपवावे. त्या व्यक्तीला फिरू देऊ नये. जर साप चावलेला व्यक्ती चालत फिरत असेल तर मात्र सापाचे विष शरीरामध्ये ताबडतोब पसरते.
या व्यक्तीला सर्पदंश झालेला आहे त्या व्यक्तीला धीर द्यावा व त्याला घाबरू नये. जर व्यक्तीला घाबरवले तर घाबरल्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह वाढतो व शरीरामध्ये विष लवकर पसरते. तसेच साप चावलेल्या व्यक्तीला जास्त बोलू देऊ नये.
साप चावला तर हे करू नये
साप चावल्यानंतर संबंधित व्यक्तीला मांत्रिकाकडे घेऊन न जाता ताबडतोब दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न करावा. तसेच आपण पाहतो की ज्या व्यक्तीला साप चावलेला असतो त्याला कडुलिंबाचा पाला किंवा मिरची खायला दिली जाते. हे प्रकार अजिबात करू नये कारण यामध्ये आपण वेळ वाया घालवत असतो.
त्यामुळे तात्काळ हॉस्पिटल गाठण्याचा प्रयत्न करावा. ज्या जागेवर सापाने चावा घेतलेला आहे त्या जागेवर कोणतीही औषधी वनस्पती उगाळून लावू नये किंवा कोणत्याही बिया वगैरे खाण्यास देऊ नये. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साप चावलेल्या व्यक्तीला बेशुद्ध होऊ देऊ नका.
साप चावला आहे हे कसे ओळखाल?
साप चावल्यामुळे जी काही जखम होते त्या जागेवर दातांचे व्रण दिसतात व त्या जखमेतून रक्त येते. शरीराच्या ज्या भागावर सापाने चावा घेतलेला असतो त्या जागेवर किंवा अवयवावर सूज येते व त्या जागेच्या रंगांमध्ये देखील फरक दिसून येतो. साप चावलेल्या व्यक्तीला चक्कर यायला लागतात व हृदयाचे ठोके वाढून खूप घाम येतो.