आरोग्य

Skin Health Tips: आंघोळ केल्यानंतर नका करू ‘या’ चुका! नाहीतर त्वचेची लागेल वाट, वाचा महत्वाची माहिती

Published by
Ajay Patil

Skin Health Tips:- शरीराचा विचार जर आपण केला तर आपल्याला अनेक बारीक सारिक गोष्टींची खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला काळजी घ्यावी लागते. नाहीतर अनेक छोट्या मोठ्या चुकांमुळे आपल्याला अनेक मोठ्या त्रासाला सामोरे जायचे वेळ येऊ शकते.

अगदी तुम्हाला जेवणाच्या वेळा देखील व्यवस्थित मेंटेन करणे गरजेचे असते व एवढेच नाही तर रात्री झोपण्यापासून तर सकाळी उठण्यापर्यंतच्या वेळेचा देखिल खूप परिणाम हा शरीराच्या आरोग्यावर होत असतो.

तसेच शरीर स्वच्छतेच्या अनेक सवयी खूप महत्त्वाच्या असल्यामुळे  त्यादेखील खूप महत्त्वाच्या असतात. जर शरीराच्या बाह्य स्वच्छतेचा विचार केला तर यामध्ये आंघोळ खूप महत्त्वपूर्ण असते.

कारण शरीराच्या आणि त्वचेच्या स्वच्छते करिता आंघोळ करण्याशिवाय व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा पर्याय नसतो. आंघोळ जरी इतकी महत्त्वाची असली तरी देखील आंघोळ केल्यानंतर आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणे खूप गरजेचे असते.

नाहीतर आंघोळ केल्यानंतर काही छोट्याशा चुका आपल्या त्वचेला खूप मोठे नुकसान पोहोचवू शकता. त्यामुळे या लेखात आपण आंघोळ केल्यानंतर कोणत्या चुका टाळाव्यात? याबद्दल महत्वाचे माहिती बघू.

 आंघोळ केल्यानंतर या चुका करू नका

1- टॉवेलचा वापर जेव्हाही तुम्ही आंघोळ केल्यानंतर बाहेर याल तेव्हा लगेचच टॉवेलने चेहरा पुसू नये किंवा घासू नये. जर तुम्ही आंघोळ केल्यानंतर लगेचच टॉवेलने चेहरा पुसला किंवा घासला तर त्वचा मोठ्या प्रमाणावर खराब किंवा निर्जीव होण्याची शक्यता वाढते.

2- रासायनिक क्रीम आणि मॉइश्चरायझरचा वापर आंघोळ केल्यानंतर लगेचच त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा रासायनिक क्रीम किंवा मॉइश्चरायझरचा वापर करू नये. लगेचच जर या गोष्टी चेहऱ्याला लावल्या किंवा त्वचेला लावल्या तर चेहरा खराब होण्याची शक्यता वाढते.

3- फुल बॉडी मॉइश्चरायझर तुम्हाला शरीर मॉइश्चरायजर करायचे असेल तर नुसता चेहरा मॉइश्चरायझ न करता संपूर्ण शरीराला मॉच्छरायझेशन करावे लागेल. जेणेकरून तुमच्या संपूर्ण शरीर मोईश्चराईज राहील.

4- शावरचा वापर बऱ्याच जणांना खूप वेळ पर्यंत आंघोळ करायची सवय असते. त्यातल्या त्यात जर शॉवर खाली आंघोळ करत असाल तर बरेच व्यक्ती बऱ्याच वेळेपर्यंत शावर खाली उभे राहतात. परंतु जर तुम्ही जास्त कालावधी करिता पाण्यात राहिला तरच त्वचा  निर्जीव होऊ शकते.

5- मेकअपचा वापर जेव्हा आपण आंघोळ करतो त्यानंतर मात्र आपल्या शरीराला खूप हलकेपणा वाटतो व अनेक आजार दूर होण्यास देखील त्यामुळे मदत होते. त्यामुळे आंघोळ केल्यानंतर लगेचच मेकअप करणे टाळावे. नाहीतर त्वचेला मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.

Ajay Patil