आरोग्य

Snake Bite: जर साप चावला तर चुकून देखील करू नका ‘या’ गोष्टी! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

Published by
Ajay Patil

Snake Bite:- भारतामध्ये वन्यजीव विविधता मोठ्या प्रमाणावर असून अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला भारतामध्ये आढळून येतात. या प्राण्यांमध्ये सरपटणाऱ्या वर्गात सापांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर भारतात आढळते. सापांच्या बाबतीत पाहिले तर भारतामध्ये ज्या उपलब्ध सापाच्या प्रजाती आहेत

त्यापैकी काही मोजक्या प्रजाती या विषारी असून बाकीच्या या बिनविषारी आहेत. भारतातील दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये अनेकदा साप चावल्याची घटना जर घडली तर पुरेशा व आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने दुर्दैवाने लोकांचा मृत्यू होतो.

या समस्येपासून मुक्तता मिळावी याकरिता भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत आयुष विभागाने एक मार्गदर्शक सूचना जारी केले असून या मार्गदर्शक तत्त्वांच्या माध्यमातून सर्पदंश जर झाला तर  लोकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत सांगण्यात आलेले आहे.

जेणेकरून दुर्गम भागामध्ये लवकर वैद्यकीय मदत मिळण्यास अडथळे निर्माण होतात व त्यामुळे उपचाराला जर वेळ लागत असेल तर तोपर्यंत रुग्णाचा जीव वाचवता येण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांची मदत होणार आहे.

 आयुष विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार साप चावला तर काय करावे?

1- सगळ्यात आधी ज्या व्यक्तीला साप चावलेला आहे त्याला धीर द्यावा आणि शांत राहण्यास त्याला मदत करावी.

2- सर्पदंशानंतर जर साप जवळपास असेल तर त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करावा.

3- ज्या ठिकाणी साप चावला आहे तो जखमी भाग जास्त प्रमाणामध्ये हलवू नये. तो स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा.

4- सर्पदंशाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दागिने, घड्याळ तसेच अंगठी किंवा घट्ट कपडे असल्यास ते पटकन काढून टाकावे.

5- रुग्णाला लवकरात लवकर स्ट्रेचरवर डाव्या बाजूला झोपायला लावावे. उजवा पाय वाकलेला असावा आणि हाताने चेहऱ्याला आधार द्यावा.

 साप चावला तर या गोष्टी करू नये

1- साप चावलेल्या व्यक्तीला धीर द्यावा व त्याला घाबरू देऊ नये.

2- सापावर हल्ला करण्याचे किंवा त्याला मारण्याची चूक कधीही करू नका. असं केल्याने साप त्याच्या बचावा करीता तुम्हाला चावा घेऊ शकतो.

3- साप चावल्यामुळे जी जखम झालेली असते ती कापू नका. तसेच त्या जखमेवर विषविरोधी इंजेक्शन किंवा औषध लावू नका.

4- जखमेवर कापड किंवा काही पट्टी बांधून रक्ताभिसरण थांबवण्याचा प्रयत्न करू नका.

5- रुग्णाला त्याच्या पाठीवर झोपू देऊ नका. असं केल्याने वायूमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो.

6- पारंपारिक उपचारांचा प्रयत्न करू नका.

Ajay Patil