Bath Tips In Winter Sesion:- आपण टीव्ही किंवा मोबाईलमध्ये असे अनेक व्हिडिओ पाहतो की काही व्यक्ती मैदानावर खेळताना अचानक कोसळतात व त्यांचा मृत्यू होतो किंवा जिममध्ये एक्सरसाइज करत असताना अचानक कोणीतरी खाली कोसळते व त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.
गेल्या एक ते दोन वर्षापासून अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे व त्यामुळे आता नक्कीच हार्ट अटॅक बद्दल अनेकांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात भीती निर्माण झाल्याचे सध्या दिसून येत आहे. हार्ट अटॅक म्हटले म्हणजे अचानक येणारा आणि वेळेमध्ये उपचार नाही मिळाले तर जीवावर बेतनारा असा एक आजार आहे.
हार्ट अटॅकच्या संदर्भात बघितले तर हिवाळ्यासारख्या ऋतूमध्ये याचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे हिवाळ्यासारख्या ऋतूत हार्ट अटॅक पासून वाचण्याकरिता काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.
याच पद्धतीने हिवाळ्यामध्ये जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा काही चुका देखील आपल्याला हार्टअटॅक येण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात व जीवावर देखील बेतू शकते. याकरिता हिवाळ्यामध्ये आंघोळ करताना काही चुका टाळणे खूप गरजेचे आहे व त्याविषयीचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
हिवाळ्यात आंघोळ करताना या चुका टाळाव्यात
1- हिवाळ्यात देखील काहींना असते थंड किंवा कडक अशा गरम पाण्याने आंघोळ करायची सवय- बरेचजण असे असतात की हे हिवाळ्यात देखील थंड पाण्याने आंघोळ करायची सवय असते.
परंतु आंघोळ करतानाची ही चूक तुम्हाला महाग पडू शकते. त्यासोबतच काहींना थंड पाणी ऐवजी कडक गरम पाण्याने आंघोळ करायची सवय असते व हे सुद्धा कारण हार्ट अटॅकसाठी कारणीभूत ठरू शकते.
2- कोमट पाण्याने आंघोळ करणे ठरेल हिताचे- हिवाळ्यामध्ये आंघोळ करण्यासाठी अतिशय थंड किंवा अतिशय गरम पाणी न वापरता तुम्ही जर कोमट पाणी वापरले तर ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
यामध्ये जर आपण हेल्थ एक्सपर्टच्या मतानुसार बघितले तर कोमट पाण्याने जर आंघोळ केली तर शरीरावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही आणि शरीराचे तापमान देखील स्थिर राहण्यास मदत होते. तसे पाहायला गेले तर कोमट पाण्याने शरीराचे तापमान वाढते व रक्ताभिसरण देखील प्रोत्साहित होऊन त्यात सुधारणा होते.
थंड पाण्याने अंघोळ करणे कसे आहे धोकादायक?
हिवाळ्यासारख्या ऋतूमध्ये थंड वातावरण असते व अशा वातावरणात जर आपण थंड पाण्याने आंघोळ केली तर अशावेळी शरीरावर अचानकपणे काटे येतात. अशावेळी आपलं शरीर अस रिऍक्ट करत असते जसं की काहीतरी इमर्जन्सी आहे
व अशावेळी ब्लड सर्क्युलेशनमध्ये वाढ होते आणि याप्रसंगी हृदय देखील रक्त पंप करण्यासाठी वेगाने काम करायला लागते. अशाप्रसंगी हृदय रक्ताचे सर्क्युलेशन थांबवतो व ज्यामुळे आपण थरथरायला लागतो व हृदयावर देखील यामुळे अधिक दबाव वाढतो.
हिवाळ्यात आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती?
1- सगळ्यात अगोदर आंघोळ करायला सुरुवात करताना पायांवर पाणी टाकावे.
2- त्यानंतर कमरेच्या खालच्या भागावर पाणी टाकावे व त्यानंतर शरीराच्या वरच्या भागावर हळूहळू पाणी टाकणे सुरू करावे.
3- अचानकपणे संपूर्ण शरीरावर थंड किंवा गरम पाणी ओतणे टाळावे. असं केल्याने शरीराच्या तापमानात अचानक घट होऊन हृदयावर दबाव येऊ शकतो.
4- अतिशय थंड वातावरण असेल तर आंघोळ केल्यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे आंघोळ केल्यानंतर उबदार कपडे लगेच घालावेत आणि स्वतःला जितके झाकता येईल तेवढे झाकून ठेवावे.
5- थंडीचे प्रमाण जर जास्त असेल तर पहाटे आंघोळ करणे टाळावे. त्याऐवजी दिवसा आंघोळ करण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा कमाल तापमान किंचित जास्त असते.