आरोग्य

Health Tips : सणासुदीदरम्यान आरोग्यदायी आहाराबाबत अशी घ्यावी काळजी

Published by
Ahmednagarlive24 Office

Health Tips : सणासुदीचा काळ सुरू झाला. सर्वत्र गोड पदार्थ व मिठाईचा स्वाद दरवळताना पाहायला मिळतो, ज्यामुळे गोड पदार्थ व मिठाईच्या सेवनामुळे कॅलरीमध्ये वाढ होणे स्वाभाविक आहे. पण या स्वादिष्ट पदार्थाच्या अतिसेवनामुळे वजनामध्ये वाढ होऊ शकते, जे आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकते.

वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाद्यपदार्थ सेवनावर देखरेख ठेवणे महत्त्वाचे आहे. जर सणासुदीच्या काळाचा आनंद घेण्यासह आरोग्यदेखील उत्तम ठेवू शकलो तरच या सणांचे महत्त्व योग्य प्रकारे आपल्याला कळले असे म्हणता येईल.

जेवण चुकवू नका

तुम्ही पौष्टिक ब्रेकफास्टचे सेवन करत दिवसाची सुरुवात करू शकता. तसेच ब्रेकफास्टव्यतिरिक्त दिवसभरात आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करा, ज्यामध्ये प्रथिने व फायबर उच्च प्रमाणात असतात. सामान्य नियम म्हणजे दर दोन ते तीन तासांनी किंवा गरजेनुसार आरोग्यदायी स्नॅकचे सेवन करा.

आरोग्यदायी पेय सेवन करा

एरेटेड आणि साखरयुक्त पेये सेवन करणे टाळावे. त्याऐवजी सुट्टीच्या हंगामादरम्यान ग्रीन टी, डिटॉक्स वॉटर, नारळपाणी, फ्रेश ज्यूस आणि मॉकटेल्स सेवन करा

आरोग्यदायी स्नॅक्सचा आस्वाद घ्या

सणांदरम्यान आरोग्यदायी स्नॅक्सच्या सेवनामुळे भुकेचे शमन होण्यासह तुम्ही सक्रिय राहण्यास मदत होते, तसेच अनारोग्यदायी खाद्यपदार्थांच्या सेवनावर देखील नियंत्रण राहते. अनारोग्यकारक स्नॅक्सऐवजी मीठ, साखर व फॅटचे कमी प्रमाण असलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करा. भाजलेले मखाना, भाजलेले चणे, ग्रॅनोला बार, ट्रेल मिक्स, खाखरा, बदाम आणि सुकामेवा इत्यादी काही रोस्टेड स्नॅक्स प्रकार आहेत.

आरोग्यदायी पर्यायांची निवड करा

तुम्ही संतुलित आहाराचे सेवन करत असाल तर तुमचे आवडते खाद्यपदार्थ व डेसर्टसचा आस्वाद घेऊ शकता. पर्यायी घटकांचा वापर करा. लहान पर्याय देखील उत्तम आहे. मध किंवा गुळाचा वापर करा.

प्रत्येक आहारासह सलाडचे सेवन करा

आरोग्यदायी, ताज्या सलाडचे सेवन करत तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटू शकते. ताज्या घटकांसह तयार केलेल्या सलाडमधून फायबर आणि आरोग्यदायी मिनरल्स मिळतात.

घरामध्ये गोड पदार्थ तयार करा

गोड पदार्थाशिवाय सण साजरा होतच नाही. पण याबाबतीत मोठी समस्या म्हणजे बहुतांश मिठाई किंवा गोड पदार्थ स्टोअर्समध्ये बनवले जातात आणि त्यामध्ये साखर, फॅट, रिफाइंड पीठ व रंग मोठ्या प्रमाणात असतात. यंदा गोड पदार्थ खरेदी करण्याऐवजी प्रिमिअम उत्पादने व आरोग्यदायी पर्यायांचा वापर करत घरामध्ये स्वतःच्या आवडीचे गोड पदार्थ तयार करा.

Ahmednagarlive24 Office