अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- आपल्याला चांगले निरोगी आरोग्य लाभावे यासाठी पूर्ण झोप ही अतीशय आवश्यक आहे. साहजिक आपल्याला दुपारी जेवणा नंतर झोप येतेच.
मात्र, हीच झोपण्याची सवय आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. या झोपेच्या सवयीमुळे आपल्या शरीराला बऱ्याच व्याधी या जडतात. दुपारी घेतलेल्या झोपेमुळे कफदोष व पचनाचे दोष निर्माण होतात. त्याचबरोबर शरीरात मेदाचाही संचय होतो.
त्यामुळे या व्याधीं नको असतील तर दुपारची झोप टाळावी…
मोठ्या प्रमाणात वजन वाढते – दुपारी झोपायच्या सवयी मुळे शरीरामध्ये फॅट म्हणजेच मेदाचा संचय होतो.यामुळे आपले मोठे प्रमाणात वजन वाढायला सुरुवात होते.
जखम न भरणे – कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते.
त्वचेचे विकार – कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. याचसोबत रक्त दूषित होण्याचीही शक्यता असते. यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शीतपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात कोंडाही होऊ शकतो.
मधुमेह वाढतो – पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.