आरोग्य

मधुमेहाला मुळापासून दूर करतील ‘हे’ ५ ड्रिंक्स, काही दिवसातच होतो चांगला परिणाम

Published by
Ahmednagarlive24 Office

Health News : मधुमेह हा आजार कॉमन झाला आहे. अनेक घरांत मधुमेहाचे रुग्ण आढळतात. मधुमेहाच्या रुग्णाला अनेक नियम पालन करावे लागते. या लोकांसाठी तयार केलेले अन्न पूर्णपणे संतुलित असावे लागते.

मधुमेहींना काहीही खाण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा लागतो. मधुमेहाच्या प्रत्येक रुग्णाला अशा अनेक समस्या असतात. जर तुम्ही अशा समस्येने त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला काही हेल्दी ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही आरामात पिऊ शकता.

1. ग्रीन टी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर पेय आहे. ग्रीन टीमध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरी कमी असतात. यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करतात.

2. काकडी

काकडीत कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि अमिनो अॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. काकडीचा रस रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतो. उन्हाळ्यातील संसर्ग आणि सांधेदुखीमुळे होणारी सूज कमी करण्यासाठीही काकडी खाणे फायदेशीर ठरते.

3. नारळाचे पाणी

यात जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. साखरेची पातळी कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.

4. सत्तू

हे मधुमेहींसाठी खूप चांगले आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि ग्लाइसेमिक इंडेक्सदेखील कमी होतो. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

5. ताक

उच्च कॅल्शियम आणि कमी ग्लाइसेमिक इंडेक्स मुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप चांगले मानले जाते. पोटाच्या अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो.

Ahmednagarlive24 Office