Health Tips:- शरीराच्या उत्तम आणि सुदृढ आरोग्याकरिता अनेक पोषक घटकांची आवश्यकता असते व या पोषक घटकांची पूर्तता ही संतुलित आहाराच्या माध्यमातून शरीराला होत असते. याकरिता हिरवा भाजीपाला तसेच मटन, मासे इत्यादी पदार्थांचा आहारामध्ये समावेश केला जातो.
शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता कॅल्शियम, प्रथिने तसेच विटामिन ए, विटामिन डी व मॅग्नेशियम तसेच फॉस्फरस सारख्या पोषक घटकांची आवश्यकता असते व असे पोषक घटक प्रामुख्याने आपल्याला दुधापासून मुबलक प्रमाणामध्ये मिळतात.
म्हणून दुधाला पूर्णान्न असे म्हणून देखील संबोधले जाते. परंतु दूध हे शरीरासाठी जितके फायद्याचे आहेत तितके जर काही पदार्थ दुधासोबत सेवन केले तर ते नुकसानदायक देखील ठरू शकते. नेमके दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नये किंवा सेवन करू नये? याबाबतचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेणार आहोत.
दुधासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ
1- दूध आणि दही– जर आपण आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेदानुसार दुधासोबत दह्याचे सेवन केले तर ते आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. तुम्ही जर दूध पिल्यानंतर दही खाल्ले तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या पोटावर होऊ शकतो म्हणजेच पोटाची समस्या उद्भवू शकते.
2- दूध आणि आंबट फळे– तुम्ही जर दूध पीत असाल तर त्यासोबत कधीही एखादे आंबट फळ खाऊ नये. तसेच केळी सह दुधाचे सेवन किंवा दुधात केळ बारीक करून खाण्याची बरेच जणांना सवय असते. परंतु जर दूध आणि केळीचे एकत्र सेवन केले तर कफाची समस्या निर्माण होऊ शकते.
3- उडदाची डाळ आणि दूध– तुम्ही जर उडदाची डाळ खाल्ली असेल तर त्यानंतर लगेच दूध पिणे टाळणे हे हिताचे ठरते. जर यामध्ये तज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्या मते यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते. उडदाची डाळ दुधासोबत खाल्ल्याने किंवा उडदाची डाळ खाल्ल्यानंतर दूध पिल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.
4- गुळ आणि दूध– बऱ्याच जणांना दुधामध्ये गुळ टाकून पिण्याची सवय असते. पण आयुर्वेदानुसार पाहिले तर दूध आणि गुळाचे एकत्रित सेवन हे शरीरासाठी हानिकारक मानले गेले आहे. त्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते.
5- मासे आणि दूध– आरोग्यासाठी मासे खूप फायदेशीर आहेत यामध्ये कुठली शंका नाही. परंतु दुधासह माशांचे सेवन टाळणे हिताचे ठरते. यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात तसेच पोट दुखी होऊ शकते. इतकेच काय तर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या देखील निर्माण होण्याची शक्यता बळावते.
6- मसालेदार पदार्थ आणि दूध– जर तुम्ही दुधासोबत मसालेदार पदार्थ खात असाल तर शरीरासाठी हे देखील नुकसानदायक आहे. यामुळे ॲसिड रिफ्लक्सचा धोका उद्भवू शकतो व अपचनाचा त्रास देखील होऊ शकतो.