आरोग्य

शरीरात दिसली ‘ही’ लक्षणे तर समजून जा तुमच्या रक्ताभिसरणात येतायेत खूप अडचणी दुर्लक्ष कराल तर महागात पडेल

Published by
Ahmednagarlive24 Office

Health News : रक्ताभिसरण ही बॉडी फंक्शनिंग मधील सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे. यामध्ये थोडा जरी गोंधळ झाला तरी तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकतो. शरीर निरोगी राहण्यासाठी आणि योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी सर्व अवयवांमध्ये पुरेसे रक्ताभिसरण असणे आवश्यक आहे.

तथापि, कधीकधी विविध कारणांमुळे या प्रक्रियेत अडथळा येतो, ज्यामुळे हळूहळू आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात आणि आपण खूप आजारी पडू शकता. मात्र एक चांगली गोष्ट म्हणजे रक्ताभिसरण बिघडले की शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसून येतात, जी वेळीच ओळखली तर गंभीर आजार टाळता येतात. या ठिकाणी आपण अशा लक्षणांबद्दल जाणून घेऊयात की जे खराब ब्लड सर्कुलेशन बाबत आपल्याला आधीच सजग करते.

हात-पाय थंड पडणे

जर तुमचे हात-पाय खूप उष्ण वातावरणातही अनेकदा थंड पडत असतील आणि त्यांचा रंग थोडा पिवळसर पडू लागला असेल तर हे खराब रक्ताभिसरणाचे महत्त्वाचे लक्षण आहे. विशेषत: अशा समस्येला वेळोवेळी सामोरे जावे लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

घोटयात सूज येणे

रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे विनाकारण घोटयात सूज येऊ शकते. खरं तर रक्ताभिसरण योग्य नसेल तर हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यासाठी धडपड करावी लागते, अशा परिस्थितीत शरीराच्या खालच्या भागात द्रव जमा होऊ लागतो, ज्यामुळे या भागात सूज वाढते.

अधिक थकवा आणि अशक्तपणा

सामान्य दैनंदिन कामे करताना आपल्याला अधिक थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर तो खराब रक्ताभिसरणाचा परिणाम असू शकतो. रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे हाडे आणि स्नायूंना पुरेसे पोषण मिळत नाही, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात, अनावश्यक थकवा येतो.

हात-पायास मुंग्या येणे

जर तुम्हाला वेळोवेळी हात, पाय किंवा शरीराच्या कोणत्याही भागात तीव्र मुंग्या येत असतील तर हे देखील आपल्या शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसल्याचं लक्षण आहे. जेव्हा रक्त प्रवाहात व्यत्यय येतो तेव्हा आपल्या मज्जातंतूंना पूर्ण प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागात सुन्नपणा येऊ शकतो.

जखमा लवकर भरून येत नाहीत

रक्ताभिसरण कमी होत असेल तर कोणत्याही प्रकारची जखम लवकर भरून येत नाही.

Ahmednagarlive24 Office