आरोग्य

तुम्हालाही केसांच्या अनेक समस्या आहेत का? नका करू काळजी! झेंडूचे फुल करेल तुम्हाला मदत

Published by
Ajay Patil

व्यक्तीच्या आकर्षक दिसण्यामागे म्हणजे चांगल्या व्यक्तिमत्व मागे केसांची देखील भूमिका फार महत्त्वाची असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. स्त्रियाच नाहीतर पुरुष मंडळी देखील केसांची चांगले वाढ किंवा आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवतात. त्यामुळे अनेक पद्धतीचे शाम्पू किंवा कंडिशनर, काही हेअर ट्रीटमेंट देखील बरेच जण करत असतात.

परंतु बऱ्याचदा खूप काळजी घेतल्यानंतर देखील केसांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यामध्ये केसात कोंडा होणे किंवा केस गळणे, केस पांढरे होणे इत्यादी समस्या निर्माण व्हायला लागतात व या समस्या दूर व्हाव्यात याकरिता अनेक प्रकारचे उपाय केले जातात.

परंतु आपण जे काही शाम्पू वगैरे वापरतो यामध्ये काही रसायन असल्यामुळे फायदा होण्याऐवजी बऱ्याचदा तोटा झालेला दिसून येतो. त्यामुळे अशा उपायांऐवजी जर काही नैसर्गिक उपाय केले तर केसांचे आरोग्य देखील चांगले राहील आणि कुठला विपरीत परिणाम देखील केसांवर होणार नाही. याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण नैसर्गिक उपायाच्या अनुषंगाने जर झेंडूचा वापर केला तर त्याकरिता केसांना काय फायदा होतो किंवा कोणत्या समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते याबद्दलची माहिती घेणार आहोत.

 झेंडूचा वापर करेल केसांच्या समस्येपासून मुक्तता

1- केसगळती थांबवण्यासाठी प्रभावी जर आपण केस गळण्याची समस्या पाहिली तर ही महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते व पुरुषांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आहे. ही एक खूप मोठी समस्या असल्याने अनेक जण या समस्यामुळे चिंतेत असतात. परंतु या केस गळतीच्या समस्येवर झेंडू तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मदत करू शकते.

याकरिता तुम्हाला दोन ते तीन झेंडूची फुले  एक कपभर पाण्यामध्ये टाकून ते पाणी चांगल्या पद्धतीने उकळून घ्यावे. नंतर हे पाणी थंड होऊ द्यावे व त्याचा वापर केस धुण्यासाठी करावा. हा साधासुधा उपाय तुम्ही कमीत कमी दोन वेळा एका आठवड्यात केला तर काही दिवसांमध्येच तुमची केस गळण्याची समस्या संपते.

2- केसातील कोंडा कमी करण्यासाठी प्रभावी केसांमध्ये डॅन्ड्रफ अर्थात कोंडा होण्याची समस्या आता खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. केसांमधील कोंडा जर तुम्हाला नाहीसा करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या दोन कप गरम पाण्यामध्ये चांगल्या उकळून घ्याव्यात व या मिश्रणामध्ये कडुलिंबाचे तेल मिक्स करावे. त्यानंतर हे मिश्रण एका बाटलीमध्ये भरून ठेवावे व या मिश्रणाचा स्प्रे टाळूवर आणि केसांवर करावा. या उपायाने केसातील कोंडा कमी होतो व काही दिवसांमध्ये तो संपूर्णपणे दूर होतो.

3- केसांच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर तुमचे केसांचे आरोग्य उत्तम राहावे व केस चमकदार व्हावेत याकरिता तुम्हाला झेंडूचे फुले खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतात. याकरिता तुम्ही दोन ते तीन झेंडूची फुले घ्यावीत व त्या फुलांच्या पाकळ्या काढून घ्याव्यात व या पाकळ्या खोबरेल तेलामध्ये उकळून घ्याव्यात. यामध्ये तुम्ही कापूर देखील टाकू शकतात. त्यानंतर हे तेल टाळू आणि केसांवर व्यवस्थित लावावे. या साध्या उपायाने देखील तुमचे केस आरोग्यदायी राहतील व मजबूत देखील होतील.

अशा पद्धतीने तुम्ही झेंडूच्या फुलाच्या मदतीने  तुम्ही तुमच्या केसांचे आरोग्य अबाधित ठेवू शकतात.

Ajay Patil