आरोग्य

बाजारातून तुम्ही केमिकलयुक्त बदाम तर खरेदी करत नाही ना? वापरा ‘ही’ पद्धत आणि ताबडतोब ओळखा केमिकलयुक्त बदाम

Published by
Ajay Patil

सध्या सणासुदीचा हंगाम किंवा सीझन सुरू झाल्यामुळे साधारणपणे प्रत्येक घरांमध्ये ड्रायफ्रूट्स मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. परंतु नेमके अशाच मागणी वाढल्याच्या कालावधीमध्ये अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रमाण देखील वाढताना आपल्याला दिसून येते.

तसे पाहायला गेले तर खाद्यपदार्थांमधील भेसळ हा एक ज्वलंत आणि गंभीर असा प्रश्न असून मानवाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खूपच संवेदनशील असा आहे.

आपल्याला माहित आहे की दुधापासून तर अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते. अशा प्रकारचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपल्याला असे भेसळयुक्त पदार्थ ओळखता येणे खूप गरजेचे आणि तितकेच महत्त्वाचे देखील आहे.

अगदी त्याचप्रमाणे जर तुम्ही बाजारातून बदाम खरेदी करत असाल तर बदाम जास्त आकर्षक आणि चमकदार बनवण्याकरिता आरोग्याला नुकसानदायक अशा रसायनांचा वापर केला जाण्याची शक्यता असते.

साधारणपणे बदाम चमकदार आणि आकर्षक दिसावा याकरिता हायड्रोजन पेरॉक्साइड आणि ब्लिचिंग एजंट यासारख्या रसायनांचा वापर केला जातो. चुकून जर अशा प्रकारची रसायने वापरलेला बदाम खाल्ला गेला तर मात्र एलर्जी किंवा पोटाशी संबंधित आरोग्य विषयक समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते.

कारण हायड्रोजन पेरॉक्साईड हे रसायन पोट आणि आतड्यामध्ये समस्या निर्माण करू शकते व त्यामुळे उलट्या तसेच पोटदुखी, जुलाब इत्यादी त्रास जाणवू शकतात.

अशा प्रकारचे केमिकलयुक्त बदाम बरेच दिवस खात राहिले तर पचनक्रिया देखील खराब होऊ शकते. याव्यतिरिक्त ब्लिचिंग एजंट जर शरीरात गेले तर कॅन्सर सारखा आजाराचा धोका देखील निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर बादाम खरेदी करत असाल तर त्याची शुद्धता आपल्याला ओळखता येणे तितकेच गरजेचे आहे.

 कशा पद्धतीने ओळखाल केमिकलयुक्त बदाम किंवा बदामाची शुद्धता?

जर बाजारातून बदाम खरेदी करत असाल तर तो अस्सल आहे की बनावट आहे किंवा केमिकलयुक्त आहे हे जर तुम्हाला तपासायचे असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करून ते तपासू शकतात.

याकरिता तुम्हाला बदाम घेऊन ते एखाद्या स्वच्छ वाटी किंवा भांड्यामध्ये ठेवावे लागतील. त्यानंतर त्या भांड्यात/वाटीत पाणी भरून बादाम त्याच्यामध्ये टाकावेत किंवा एका वाटीत बदाम पूर्णपणे बुडू द्यावे व रात्रभर त्यांना असेच भिजत राहू द्यावे.

दुसऱ्या दिवशी सकाळी बदामाचे पाणी काढून टाकावे व बदामाची साल काढावी. जर अस्सल नैसर्गिक बदाम असतील तर त्यांची साल सहजपणे निघून जाते आणि साफ आणि स्वच्छ असे बदाम तुम्हाला मिळतात.

पाण्यातून बदाम काढल्यानंतर पाण्याचा रंग तपासून घ्यावा. जर पाण्याचा रंग बदलला असेल तर बदामा मध्ये केमिकलचा वापर केला आहे हे तुम्हाला चटकन कळते.

कारण जर हायड्रोजन पेरॉक्साईडचा ब्लिचिंग साठी वापर केला असेल तर रसायन पाण्यासोबत रिएक्शन करते व याच कारणामुळे पाण्यात भिजवलेला बदाम जर भेसळयुक्त असेल तर पाण्याचा रंग पिवळा होतो.

जेव्हा हे रसायन पाण्याच्या संपर्कामध्ये येते तेव्हा ते रंग सोडते व पाण्याचा रंग बदलतो. त्यामुळे ही रासायनिक प्रक्रिया भेसळुक्त बदाम असल्याचे संकेत देते. अशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने भेसळयुक्त बदाम ओळखू शकतात.

Ajay Patil