आरोग्य

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी जास्त काही नाही फक्त ‘हा’ छोटा फंडा वापरा आणि झटपट वजन कमी करा! वाचा काय म्हणतात तज्ञ?

Published by
Ajay Patil

Weight Loss Tips:- बदललेली जीवनशैली आणि आहार विहारातील झालेला बदल यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण झाल्याचे आपण पाहतो. धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांचे संतुलित आहार घेण्याकडे सपशेल दुर्लक्ष होत असून जंक फूड्सचा आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने डायबिटीस तसेच हाय ब्लड प्रेशर तसेच हृदयरोग यासारख्या समस्यांनी व्यक्तींना ग्रस्त केलेले आहे.

या सगळ्या समस्यांमध्ये वाढते वजन ही समस्या अनेक जणांना येत असल्याने देखील आरोग्याच्या अनेक समस्या यामुळे उदभवल्या आहेत. वाढते वजन कमी करण्यासाठी बरेच व्यक्ती नाना तऱ्हेचे उपाययोजना करतात. परंतु हवा तेवढा परिणाम आपल्याला दिसून येत नाही.

तसेच डायटिंग व कित्येक तास जिममध्ये घालवणे यासारखे देखील उपाययोजना केल्या जातात. परंतु तरी देखील वजन मात्र कमी होत नाही.

यामध्ये जर पाहिले तर आहाराकडे योग्य लक्ष दिले आणि थोडाफार प्रमाणात व्यायाम केला तरी वजन लवकरात लवकर कमी करणे शक्य आहे. याविषयी आरोग्य तज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

 झटपट वजन कमी करण्यासाठी काय दिली तज्ञांनी माहिती?

वाढते वजन कमी करणे हे प्रामुख्याने खूप कठीण गोष्ट असल्याचे आपल्याला दिसून येते. खूप मोठ्या प्रमाणावर वजन कमी करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात परंतु त्यामध्ये ते यशस्वी होत नाहीत. परंतु काही व्यक्ती अगदी थोड्याशा प्रमाणात कष्ट करून वजन कमी करतात.

तज्ञांच्या मतानुसार बघितले तर तुम्ही अधून मधून किंवा मध्यांतराने चालण्याचा व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही तीन ते पाच मिनिटांपर्यंत मध्यम गतीने चालावे आणि 30 ते 60 सेकंद वेगाने चालावे किंवा अगदी हळू जॉगिंगचा यामध्ये समावेश केला तरी चालते.

जेव्हा तुम्ही उच्च तीव्रतेच्या मध्यंतराच्या धावाल तेव्हा तुमच्या कमाल हृदय गतीचे 80 ते 90% च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही क्रश होणार नाहीत व तरी देखील कॅलरी बर्न करू शकता.

तुम्ही जर तीव्रतेने किंवा वेगात धावत असाल तर धावल्यानंतर थोडे रिलॅक्स होण्याकरिता 30 सेकंद चालणे गरजेचे आहे व यामुळे हृदयाची गती हळूहळू कमी होण्यास मदत होते.

 फक्त काही पावले चालण्याचे फायदे

तसेच चालणे हा देखील एक उत्तम व्यायाम असून तुम्हाला जर लठ्ठपणा वाढू नये किंवा हृदयाशी संबंधित काही आजार होऊ नयेत असे वाटत असेल तर तुम्ही याकरिता काही पावले चालणे गरजेचे आहे. चालण्यामुळे तुमची पचनक्रिया आणि चयापचय क्रिया देखील उत्तम राहते व तुमचे शरीर सक्रिय राहिल्याने शरीराला जडपणाची समस्या येत नाही.

तसेच मानसिक आरोग्य देखील उत्तम प्रकारे सुधारते. त्यामुळे दररोज काही पावले चालणे गरजेचे आहे. याशिवाय मध्यांतर चालणे कठोर अंतराल दरम्यान हृदयाची गती वाढवून हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फिटनेस सुधारते व यामुळे हृदयाची कार्यक्षमता देखील हळूहळू वाढते व सहनशक्ती देखील वाढते.

तसेच अंतराल चालण्याच्या विविध गतीमुळे तुमच्या शरीराची हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन पोहोचवण्याची क्षमता देखील वाढते. मध्यांतर चालणे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्याचा आणि रक्तातील साखरेची पातळी चांगली नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

चालण्यासोबतच तुम्ही डायट वरील कंट्रोल ठेवणे आवश्यक असते. आरोग्याला अपयकारक गोष्टी तुमच्या आहारामधून काढून टाकणे गरजेचे आहे. याशिवाय पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे.

Ajay Patil