आरोग्य

Walking Mistakes : वजन कमी करण्यासाठी सकाळ- संध्याकाळ चालताय? ‘या’ 5 गोष्टींची काळजी घ्या नाहीतर मेहनत जाईल व्यर्थ

Published by
Ahmednagarlive24 Office

Walking Mistakes : तुम्ही पाहिले असेलच की लोक वजन कमी करण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवत असतात. कारण सहसा वजन कमी करणे ही सोप्पी गोष्ट नाही मात्र जर तुम्ही योग्य नियमांचे पालन करून व्यायाम केला तर तुमचे वजन लवकर नियंत्रणात येईल.

तुम्ही वजन कमी करण्यासाठी सकाळ संध्याकाळ फिरत असता. मात्र असे करूनही तुमचे वजन कमी होत नाही. आता याचे कारण काय असा प्रश्न पडतो. तज्ज्ञांच्या मते, याचे कारण म्हणजे चालताना काही चुका होतात. नीट चालत नसल्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची मेहनत वाया जाऊ शकते. त्यासाठी चालतानाच्या चुका सुधारणे गरजेचे आहे.

न्युट्रीफाय बाय पूनम डाएट अँड वेलनेस क्लिनिक, नवी दिल्लीच्या संस्थापिका पूनम दुनेजा सांगतात की, चालण्याने तुमचे वजन मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, पण त्याची पद्धत योग्य असली पाहिजे. तुमचे चालणे नियमित असावे आणि कमीतकमी 30 मिनिटे तुम्ही चांगल्या प्रकारे चालले पाहिजे.

व्यायामसोबत सर्वात महत्वाचा हा आहार असतो. चालण्याबरोबरच उत्तम आहार घेणेही खूप गरजेचे आहे. आजकाल काही गोष्टींची काळजी घेऊन वजन झपाट्याने कमी करता येते. जर तुम्ही शारीरिक हालचाली आणि खाण्यापिण्यात दुर्लक्ष करत असाल तर तुमचे वजन कमी होणार नाही. तसेच यासोबत वजन कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली देखील महत्त्वाची आहे.

तुम्ही चालताना या 5 चुका कधीही करू नका

डायटीशियन पूनम दुनेजा यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी लोकांनी नियमित चालावे. बहुतेक लोक हा नियम मोडतात आणि यामुळे त्यांचे वजन कमी होत नाही. प्रत्येकाने चालणे हा नियमित आयुष्याचा एक भाग बनवला पाहिजे.

बहुतेक लोक खूप हळू चालतात किंवा हे लोक चालताना मोबाईल वापरतात, त्यामुळे तुम्हाला चालण्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. चालताना वेगाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. लोकांनी दररोज 30 मिनिटे वेगवान चालणे म्हणजेच जलद चालणे आवश्यक आहे. यामुळे वजन कमी करण्यात खूप मदत होईल.

तसेच चालल्यानंतर बरेच लोक स्नॅक्स खातात किंवा साखरयुक्त पेय पितात. असे करणे तुमच्यासाठी चांगले नाही. कारण यामुळे तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. अशा परिस्थितीत चालताना खाणे-पिणे टाळावे आणि नेहमी आरोग्यदायी गोष्टी खाव्यात.

यासोबतच तुम्ही अनेकवेळा पाहिले असेल की चालणारे लोक स्टायलिश ड्रेस आणि बूट घालून फिरत असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. चालताना, तुमचे कपडे आणि शूज साधे आणि आरामदायक असावेत.

चालत जाणाऱ्या सर्व लोकांना असे वाटते की त्यांनी जेवण कमी केले तर त्यांचे वजन वाढेल, परंतु जेवण कमी केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. अशा परिस्थितीत चालण्याबरोबरच चांगला आहार घेणे आवश्यक आहे. कारण व्यायामसोबतच तुमचा आहार हा अधिक महत्वाचा असतो.

Ahmednagarlive24 Office