डिप्रेशन मधून बाहेर पडायचंय ? हा आहे सर्वात सोपा मार्ग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health News : सध्याच्या स्पर्धेच्या युगात नोकरदार आणि व्यावसायिकांना सतत मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळेच सध्या ‘डिप्रेशन’ अर्थात नैराश्य ही समस्या चिंताजनकरीत्या वाढल्याचे दिसत आहे.

नैराश्यावर मात करण्यासाठी डॉक्टर काही औषधे देतात, पण ती फार महाग असल्याने सर्वसामान्यांना परवडत नाही. अशावेळी काही आरोग्यतज्ज्ञ नैराश्यावर उपाय म्हणून असे काही पदार्थ खाण्याचा सल्ला देतात की, जे पदार्थ आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असतात.

साखर खाल्ल्याने डिप्रेशन दूर होते, असे याआधी झालेल्या अनेक संशोधनांमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञ मनावर नैराश्याचे मळभ आले असता, डेझर्ट आणि केक यांसारखे गोड पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. शरीरात साखरेचे प्रमाण नवीन ऊर्जा देते. निराशा वाटत असल्यास लगेच पेस्ट्री किंवा एखादी आवडती मिठाई खाल्ल्यास मनाला उभारी लाभते.

काबोहाइड्रेटचे सेवन हेदेखील नैराश्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठी लाभदायक ठरते, म्हणून ब्रेडमध्ये आढळणारे काबोहाइड्रेटवर जॅम लावून खाल्ल्याने बरे वाटते. ब्रेडएवजी मफिन्स, ओट मिल्कदेखील सेवन उपयुक्त ठरते.

रोज अंडे खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे, हे आपण जाणतोच. मात्र, अंड्यामध्ये आढळणारे डीएचए हा घटक डिप्रेशन दूर करण्यासही मदत करतो, असे तज्ज्ञ सांगतात.

हिरवीगार पालकची भाजी खाण्याने शरीराला व्हिटॅमिन बीसह आयरन भरपूर प्रमाणात मिळते. म्हणून निराश वाटत असल्यास किमान दोन कप पालक सूप पिण्याने लाभ होतो. महिलांमध्ये आयरनची सर्वाधिक कमी असते म्हणून त्या डिप्रेशनला बळी पडतात.