आरोग्य

Weight Loss Diet: वजन कमी करायच आहे ना? आजपासून ‘हे’ 5 पदार्थ खाणे बंद करा! दिसाल फिट आणि वजन होईल कमी

Published by
Ajay Patil

Weight Loss Diet:- वाढत्या वजनाची समस्या आज पंधरा ते वीस वर्षाच्या तरुणांपासून तर साधारणपणे प्रत्येक वयाच्या व्यक्तीमध्ये दिसून येते. या समस्येमागील जर आपण प्रमुख कारणांचा शोध घेतला तर प्रामुख्याने आपल्या दैनंदिन रुटीन मधील झालेला बदल, पाण्याच्या बदललेल्या सवयी तसेच व्यायामाचा अभाव,  नको ते पदार्थ खाण्याची लावून घेतलेली सवय इत्यादी कारणांमुळे वजन वाढीची समस्या प्रामुख्याने आपल्याला दिसून येते.

वाढते वजन म्हटले म्हणजे हे अनेक आजारांना निमंत्रण देणारे ठरते. यामध्ये प्रामुख्याने मधुमेहापासून तर उच्च रक्तदाब आणि हृदयरोगा सारख्या समस्यांना देखील निमंत्रण देते. त्यामुळे बरेच व्यक्ती वजन कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रयत्न करताना दिसतात.

परंतु जर वजन कमी करायचे असेल तर जितके व्यायामाला किंवा इतर वर्कआऊट महत्त्व आहे तितकेच महत्त्व आहाराला देखील आहे. त्यामुळे वेटलॉस करत असाल तर या दरम्यान काय खावे आणि काय खाऊ नये? या गोष्टींना देखील खूप महत्त्व आहे. त्यामुळे या लेखात आपण फिटनेस ट्रेनर सुशील धनावडे यांनी सांगितलेल्या डाइट बद्दल काही विशेष टीप्स बघणार आहोत.

 वजन कमी करायचे असेल तर चुकून देखील खाऊ नका हे पदार्थ

1- प्रोसेस्ड फुड  जर आपण लोकांचे खाण्याचे प्रमाण पाहिले तर यामध्ये प्रोसेस्ड फूड खाण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. यामध्ये साखर तसेच सॅच्युरेटेड फॅट्स इत्यादी शिवाय यामध्ये प्रिझर्वेटिव्हज येथील मोठ्या प्रमाणावर मिसळलेले असतात

व ते शरीरासाठी खूप हानिकारक असते. त्याचा थेट परिणाम मानवी शरीरावर आणि मेंदूवर व्हायला लागतो व त्यामुळे वजन कमी करण्याच्या कालावधीत अशा पद्धतीचे प्रोसेस्ड फूड खाण्याचे टाळणे खूप फायद्याचे ठरते.

2- हाय शुगर ड्रिंक्स उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये किंवा इतर कालावधीमध्ये देखील जेव्हा व्यक्तीला तहान लागते तेव्हा बऱ्याच जणांना कोल्ड्रिंक्स प्यायची सवय असते. परंतु अशा कोल्ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते व फ्रुट ज्यूसमध्ये देखील साखर जास्त असते.

अशा पद्धतीने कोल्ड्रिंक सेवन केल्याने वजन तर वाढतेच परंतु रक्तातील साखरेच्या पातळीत देखील वाढ होते. त्यामुळे तुम्ही देखील वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर सर्वात प्रथम हाय शुगर ड्रिंक्स घेणे टाळावे.

3- रिफाईंड फूड बहुतेक पदार्थ तयार करताना त्यामध्ये मैद्याचा वापर केला जातो व बऱ्याच फास्ट फूड मध्ये देखील मैदा वापरला जातो. मैदा हा वजन वाढवण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो व एवढेच नाही तर पचनशक्ती देखील बिघडवण्याचे काम करतो. त्यामुळे आहारातून मैदा हद्दपार करणे खूप गरजेचे आहे.

4- फास्ट फूड सध्या जर आपण खाण्याचा ट्रेंड पाहिला तर फास्ट फूड तसेच बाहेर गाड्यांवर मिळणारे पदार्थ किंवा फ्राईड फूड म्हणजेच तळलेले पदार्थ खाण्याचा ट्रेंड आपल्याला दिसून येतो.

परंतु यामुळे देखील वजन वाढते. याशिवाय जिलेबी, आईस्क्रीम आणि गुलाबजाम इत्यादी पदार्थ खाल्ले तरी यामध्ये हाय कॅलरीज डेझर्ड असतात व त्यामुळे देखील वजन वाढते. त्यामुळे असे पदार्थ तुम्ही खात असाल तर त्यांना आहारातून वगळावे किंवा त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी करावे.

Ajay Patil