Weight Loss : काय.. आंबा खाल्ल्याने वजन कमी होते? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weight Loss : उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकजण आंब्यावर ताव मारताना दिसत आहे. फळांचा राजा असणारा आंबा प्रत्येकाच्या आवडीचे फळ आहे. आंब्यामुळे प्रतिकारशक्ती वाढून शरीर देखील निरोगी राहतं. सध्या अनेकजण वाढत्या वजनामुळे खूप हैराण आहेत.

अनेक उपाय करूनही अनेकांचे वजन कमी होत नाही. वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच तुम्ही यावर घरबसून उपाय करू शकता. तुम्ही आंबा खाऊनही वजन कमी करू शकता. कसे ते जाणून घ्या.

जाणून घ्या आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 

कोणत्याही अन्नाचा रक्तातील साखरेवर होणारा परिणाम ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे GI रँकद्वारे ओळखला जातो. हे 0-100 च्या प्रमाणात मोजले जात असून 55 पेक्षा कमी रँक असणारे कोणतेही अन्न या प्रमाणात कमी साखर मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पदार्थ मधुमेही रुग्णांसाठी उत्तम मानले जातात. हे लक्षात घ्या की आंब्याचा जीआय रँक 51 असल्याने तो मधुमेही रुग्णही सहज खाऊ शकतात.

वजन कमी करायचे असेल तर खा आंबा

मायक्रोन्युट्रिएंट्स आणि फायबर

दरम्यान आंब्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तरी तुम्ही तो खाऊ शकता, परंतु तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खा. समजा तुम्ही मोठ्या प्रमाणात आंबा खाल्ला तर तुमच्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो.

दुपारी करावे सेवन 

हे लक्षात घ्या की आंबा खाल्ल्यानंतर कधीही खाऊ नये. कारण त्यामुळे तुमच्या शरीरात जास्त कॅलरीज जाऊ शकतात. त्यामुळे आंबा नेहमी दुपारी खा. तसेच तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्नॅक म्हणूनही आंब्याचं सेवन करू शकता.

स्नॅक्स म्हणून करता येते सेवन

समजा तुम्ही एक वाटी आंबा स्नॅक्स म्हणून खात असल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. कारण आंब्यामध्ये आहारातील फायबर्स मुबलक प्रमाणात असते. तसेच आंबा एनर्जी बूस्टर म्हणूनही काम करत असतो. तसेच तुम्ही ते प्री-वर्कआउट फूड म्हणून आंबा खाऊ शकता.

याचे करा संपूर्ण सेवन 

आंब्याचा रस किंवा मँगो शेक बनवण्यापेक्षा आज ते सामान्य पद्धतीने खावा. कारण तुम्ही त्याचा रस बनवला तर आंब्यातील सर्व फायबर नष्ट होतात.