Nipah Virus : केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात निपाहचा विषाणू आढळला आहे. आतापर्यंत त्या ठिकाणी दोघांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आणि आरोग्य विभागाच्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
निपाह (एनआयव्ही) विषाणूमुळे मनुष्य आणि प्राणी दोघांमध्येही गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण होऊ शकतात. एनआयव्ही प्रथम १९९८ मध्ये मलेशियातील वराहपालकांमध्ये आढळला होता.
वटवाघळे ही या विषाणूची नैसर्गिक वाहक आहेत. कोरोना काळात कोणत्या नव्या व्हायरसचे नाव ऐकले तरी अंगावर काटा येतो. या व्हायरसने जगात खळबळ उडवून दिली. याआधी अनेक प्रकारच्या व्हायरसशी लोकांचा सामना झाला.
या लिस्टमध्ये स्पॅनिश फ्लू निपाह व्हायरस, झिका व्हायरस आणि माल्टा ताप यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक खळबळ स्पॅनिश फ्लूने उडवली होती. या व्हायरसमुळे कोट्यवधी लोक मृत पावले होते. २०१८ मध्ये निपाह व्हायरसने केरळमध्ये पाय ठेवले. त्यावेळी निपाहमुळे १७ लोकांचा मृत्यू झाला होता.
सुरवातीचे लक्षणे
प्रचंड ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी उलट्या, मान आखडणे, प्रकाशाची भीती वाटणे, मानसिक गोंधळ, उलट्या आणि बेशुद्ध होणे, श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे दिसतात.
गंभीर स्वरूपातील लक्षणे
जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर त्याला ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, घशात खवखव, न्युमोनिया यांसारखी लक्षणे दिसातात. एखाद्याची प्रकृती गंभीर असेल तर त्याला एन्सेफलायटीस (मेंदूला सूज येणे) होऊ शकतो आणि 24 ते 48 तासांच्या आत कोमामध्ये जाऊ शकतो.
उपचार
सर्वांनी लक्षात ठेवायला हवे की या या विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गावर कोणतेही ठोस उपचार नाहीत. मात्र संसर्ग झाल्याचे लक्षात येताच रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवणे आवश्यक आहे. या विषाणूमुळे होणारे आजार टाळण्यासाठी कोणतीही लस नाही. संसर्ग झाल्यावर इन्क्युबेशन कालावधी ५ ते १४ दिवस.
थोडा इतिहास
मलेशियातील कम्पंग सुगाई निपाह गावात या व्हायरसबाबत सर्वात आधी समजले होते. या गावाच्या नावावरून या व्हायरसचे नाव निपाह पडले. या व्हायरसमुळे सर्वाधिक नुकसान मेंदूला पोहोचते.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार त्यावेळी मगरीमुळे हा आजार माणसांमध्ये आला होता. त्यानंतर सिंगापूरमध्ये निपाहचे प्रकरण समोर आले. तर २००१ मध्ये भारत आणि २००४ मध्ये बांगलादेशमध्ये काही निपाह व्हायरसबाधित लोक आढळले.
निपाहचा प्रसार कसा होतो ?
व्हायरस प्राण्यांद्वारे मनुष्यांमध्ये पसरतो. तसंच दूषित जेवणाच्या माध्यमातून हा व्हायरस एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये त्याचा संसर्ग होतो. हा व्हायरस सर्वात आधी 1998 मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमध्ये आढळला होता.
वटवाघूळ नैसर्गिक वाहक असल्याने वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळे खाल्ल्याने निपाहचा संसर्ग होण्याची शक्यता असते. एनआयव्ही संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यासही हा आजार होऊ शकतो. एनआयव्हीचा संसर्ग झालेली वटवाघळे आणि डुकरांच्या थेट संपर्कातूनही हा संसर्ग होऊ शकतो.