फक्त कावीळ झाल्यावरच नव्हे तर या आजारांचे लक्षण असल्यावर सुद्धा होतात पिवळे डोळे

Updated on -

१८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : डोळ्यांच्या रंगावरूनही आजार ओळखता येतात. पिवळे डोळे हे कावीळसह या चार आजारांचे लक्षण आहे. तज्ज्ञांकडून आपण जाणून घेऊया की, कोणते चार रोग डोळे पिवळेपणा दर्शवतात. डोळ्यांद्वारे अनेक रोग ओळखले जाऊ शकतात. पिवळे डोळे फक्त एकच नाही, तर अनेक रोग दर्शवतात. डोळ्यांचा पांढरा भाग हलका पिवळा होऊ लागला तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. पिवळे डोळे हे काविळीसह अनेक आजारांचे लक्षण असू शकते.

काविळीचे लक्षण

डोळे पिवळे होणे हे काविळीचे लक्षण असू शकते. काविळीमध्ये डोळे पिवळे पडतात, कारण या आजारामुळे यकृताला सूज येते. कावीळ यकृताचे नुकसान करते, ज्यामुळे ते बिलीरुबिन फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे काविळी आजार होऊ शकतो

मलेरिया

पिवळे डोळे हे देखील मलेरियाचे लक्षण आहे. डॉक्टरांच्या मते, मलेरियामुळे डोळ्यांचा रंगही पिवळा होतो. डोळ्यांच्या पिवळ्यापणाकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

सिरोसिस

पिवळे डोळे देखील सिरोसिसचे लक्षण आहे. जेव्हा यकृताच्या पेशी खराब होतात, तेव्हा सिरोसिस होतो. हे हळूहळू होते, या आजारात यकृताचा आकार कमी होऊ लागतो, याशिवाय यकृताचा मऊपणा कमी होऊ लागतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने सिरोसिस होतो. जर तुमचे डोळे बऱ्याच काळापासून पिवळे असतील, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जावे.

सिकल सेल अॅनिमिया

डोळे पिवळे होणे हे सिकल सेल अॅनिमियाचे कारण असू शकते. सिकल सेल अॅनिमियामध्ये शरीरात चिकट रक्त तयार होते. त्यामुळे बिलीरुबिन तयार होण्यास सुरुवात होते.पिवळ्या डोळ्यांव्यतिरिक्त, सिकल सेल अॅनिमियामध्ये बोटांमध्ये वेदना आणि सूज येण्याची समस्या देखील दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!