अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या महामारीत टिकून राहण्यासाठी आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ग्रीन टी एक उत्तम टॉनिक आहे. ग्रीन टी आपल्या शरीराचे रक्षण कोणकोणत्या प्रकारे करते ते पाहू .

ग्लूकोज प्रमाणावर नियंत्रण : – ग्रीन टी नियमित घेतल्यास ते शरीरातील फॅट सेल्स मध्ये ग्लूकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवते. जर आपण हेल्दी डाएट घेत असाल तर रोज एक्सरसाइज सोबत ग्रीन टी अवश्य घ्या.

हाडे बळकट ठेवते : – ग्रीन टीमध्ये उच्च प्रमाणात फ्लूराइड नावाचा घटक असतो जो आपली हाडे मजबूत राखण्यास सहायक असतो. जर आपण रोज ग्रीन टी पित असाल तर तो आपल्या शरीरातील हाडांची डेसिटीही टिकवून ठेवतो.

तणावमुक्ती : – ग्रीन टी मध्ये अमिनो असिड असते जे एंझ्झायटी आणि स्ट्रेस पासून सुटका देण्यास सहायक असते.

एलर्जी : – ग्रीन टी असलेले ईजीसीजी अँलर्जीरोधक असते. त्यामुळे जर आपल्याला अँलजीं असेल तर ग्रीन टी सातत्याने घेत राहा.

आर्थरायटिस : –ग्रीन टी ह्युमेटाइड आर्थराइटिस जोखीमही कमी करतो. तसेच याच्या दुष्प्रभाव पासून वाचवतो. वास्तविक ग्रीन टी शरीराचे एंझाइम्सना ब्लॉक करून कार्टिलेजचे संरक्षण करते. कारण हे एंझाइम कार्टिलेज जा कमकुवत बनवत असतात.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी : – ग्रीन टी शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो. हा वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करीत चांगल्या व वाईट कोलेस्ट्रॉंलच्या प्रमाणावरही नियंत्रण ठेवतो.

 कॅन्सर : – ग्रीन टी कॅन्सरच्या जोखमीपासूनही वाचवतो. यात आढळणारे अँटीऑक्सीडेंट ही जोखीम कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सीपेक्षा २५ पट तर व्हिटॅमिन बी पेक्षा १00 पट जास्त प्रभावी आहे. अशाप्रकारे हा आपल्या शरीरातील सेल्स डॅमेज होण्यापासून सुरक्षित ठेवतो.ज्यामुळे कॅन्सर पासून रक्षण होते.

 हृदयरोग : – ग्रीन टी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयरोग  आणि स्ट्रोक्समुळे होणारी शिहेची जोखीमही कमी करण्यास मदत करतो. एवढेच नाही तर हार्ट अँटॅकनंतर मृत पडलेल्या हार्ट सेल्स रिकव्हर करून दुसऱ्या हार्ट सेल्सच्या संरक्षणातही मदत करतो.

डायबिटीस आणि ब्लड शुगर : – ग्रीन टी लिपिड प्रोफाइल उत्तम बनवतात. ग्लूकोज मेटाबॉलिज्म रक्तात शुगर लेव्हल वाढल्यास राहते. आणि शरीराचा मेटाबॉलिक रेट नियंत्रित ठेवत असते.

अल्झायमर : – ग्रीन टी मेमरी वाढवण्यासोबतच मेमरी शार्प करण्यासही मदत करीत असते. हा जरी अल्झायमरपासून वाचवत नसला तरी ब्रेनमध्ये असलेल्या अँसेटिलकोलिन नामक घटकाची सक्रियता कमी करण्यास मदत करतो. हा घटकच अल्झायमर होण्याचे मुख्य कारण होत असतो.

पार्किन्सन : – ग्रीन टी आढळणारे अँटीऑक्सिडेंट मेंदूत होणाऱ्या सेल डॅमेजपासून वाचवण्यास मदत करतात. हे डॅमेज पार्किन्सन होण्याच्या क्रियेतील मुख्य भूमिका बजावते. जे नियमितपणे ग्रीन टी घेता त्यांना पार्किन्सन होण्याची शक्‍यता नगण्य असते.