Maharashtra news : कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा आज सकाळी पुण्यात केली.

तर दुसरीकडे निव़डणूक आयोगाने राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. १० जून रोजी ही निवडणूक होणार आहे.महाराष्ट्रातील सहा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

याशिवाय आंध्रप्रदेश ४, तेलंगणा २, छत्तीसगड २, मध्यप्रदेश ३, कर्नाटक ४, ओडिशा ३, पंजाब २, राजस्थान ४, उत्तर प्रदेश ११, उत्तराखंड १, बिहार ५, झारखंड २ आणि हरियाणा २ अशी ही निवडणूक होणार आहे.

महाराष्ट्रातील सहावी जागा आपल्याला सोडावी, तेथून आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवू, सर्व पक्षांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी सकाळीच व्यक्त केली आहे.