Fastest Electric Car : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेकांना पेट्रोल आणि डिझेलवरील गाड्या वापरने परवडत नाही. यामुळे अनेक जण इलेक्ट्रिक कार खरेदी करत आहेत. आज जगातील सर्वोत्तम वेगवान इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत.

जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार कोणती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर आज तुम्हाला अशाच एका कारबद्दल सांगणार आहोत, या कारचे नाव आहे Rimac Nevera.

ही कार बनवणाऱ्या कंपनीने दावा केला आहे की ही कार 412 किमी/तास वेगाने धावू शकते. कंपनीने या इलेक्ट्रिक वाहनाच्या वेगाची चाचणी जर्मनीमध्ये स्थित त्यांच्या ऑटोमोटिव्ह चाचणी पॅपेनबर्ग ट्रॅकवर केली आहे, ज्याची लांबी सरळ 4 किमी आहे. ही कार केवळ 1.95 सेकंदात 0-100 चा वेग पकडू शकते. चला जाणून घेऊया या कारची खासियत काय आहे.

नेवेरा ची इतकी आहे गती

नेवेरा या उत्पादनातील इलेक्ट्रिक कारने एक मैल अंतर कापणारी सर्वात वेगवान कार होण्याचा मान मिळवला आहे. ही हायपरकार केवळ 1.95 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग वाढवू शकते.

या कारमध्ये 4 इलेक्ट्रिक मोटर्स वापरण्यात आल्या आहेत. ते मिळून 1,914 bhp पॉवर निर्माण करतात. ज्या ग्राहकांनी ही कार खरेदी केली आहे त्यांना या कारमधून 352 किमी/ताशी इलेक्ट्रॉनिकली-मर्यादित टॉप स्पीड मिळाला.

जगातील सर्वात वेगवान कार

आजपर्यंत जगातील सर्वात वेगवान कार Koenigsegg Agera RS आहे. या कारची चाचणी 2017 मध्ये झाली होती. चाचणी दरम्यान, या कारने 447.18 किमी / तासाचा वेग प्राप्त केला. या कारची मोटर 1,360 Bhp पॉवर निर्माण करते.

दुसरीकडे, सुपर कार निर्माता बुगाटीने 2019 मध्ये त्यांच्या चिरॉन सुपर स्पोर्ट कारची चाचणी केली होती. या दरम्यान, 300 किमी/तास पेक्षा जास्त वेग गाठला गेला.

एसएससी तुआतारा कारने 2020 मध्ये 508.73 किमी/ताशी वेग गाठला होता, परंतु ही कार रस्त्यावर धावण्यास सक्षम नव्हती, म्हणून ती सर्वात वेगवान कार मानली जात नाही.