Hero Bikes : सध्या, भारतीय वाहन उद्योगातील जवळजवळ सर्व वाहन उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत, काही कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती अनेक वेळा वाढवण्याची घोषणा (Announcement) केली आहे.

Hero MotoCorp ने २२ जून रोजी घोषित केले की ते १ जुलै २०२२ पासून त्यांच्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या संपूर्ण श्रेणीत ३,००० रुपयांपर्यंत वाढ करेल.

वाहन निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे (rising raw material prices) कंपनीने वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय (Decision) घेतला आहे.

एप्रिलमध्येही दर वाढले होते

याआधी Hero MotoCorp ने 5 एप्रिलपासून आपल्या बाईक आणि स्कूटरच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी कंपनीचे म्हणणे आहे की, इनपुट कॉस्टमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने हे पाऊल उचलावे लागले आहे.

Hero MotoCorp च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम अंशतः भरून काढण्यासाठी किमतीत वाढ करणे आवश्यक आहे.

दुचाकींच्या किमतीत वाढ मॉडेल आणि बाजारपेठेवर अवलंबून असेल, असे कंपनीने म्हटले आहे. हिरो आपल्या बाईक (Bike) आणि स्कूटरच्या किमती २००० रुपयांनी वाढवू शकते.

Hero MotoCorp विविध मॉडेल्सची विक्री करते, एंट्री-लेव्हल HF100 (Entry-level HF100) ची किंमत रु. 51,450 पासून सुरू होते, तर Xpulse 200 4V ची किंमत रु. 1.32 लाख (एक्स-शोरूम दिल्ली) पासून सुरू होते.

विशेष म्हणजे, भारतीय वाहन बाजार अद्याप कोरोना महामारीच्या प्रभावातून सावरलेला नाही, ज्याचा अंदाज गेल्या काही महिन्यांतील कमी विक्रीवरून लावला जाऊ शकतो. तसेच इंधनाचे दरही अलीकडच्या काळात झपाट्याने वाढले आहेत.