अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  अलीकडच्या काळात चोरट्यांनी नगरी वस्तीसह मंदिराकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे आता देवच असुरक्षित झाले आहेत.(Theft)

नुकतीच चोरट्यांनी नगर तालुक्यातील जेऊर परिसरात विविध मंदिरांतील वस्तूंची चोरी केल्याने चोरट्यांनी मंदिरे टार्गेट केल्याचे दिसून येत आहे.

यात जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तांब्याची भांडी, कळशी, समई, पंचपाळे, ताट चोरून नेले तसेच इमामपूर येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात तीन किलो वजनाचा पितळी घोडा, पाच किलो वजनाची एक घंटा व सात किलो वजनाच्या दोन घंटा चोरट्यांनी चोरून नेल्या.

त्यानंतर इमामपूर येथील मळगंगा माता मंदिर बहिरोबा मळा येथील एक समई व दोन घंटा तसेच इमामपूर घाटातील गणपती मंदिरातील समई व दोन घंटा चोरून नेल्या आहेत. जेऊर परिसरात चोरट्यांनी मंदिरे टार्गेट केल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.