Ahmednagar News:श्रीरामपूरमध्ये एका हिंदू तरुणाने मुस्लिम मुलीशी लग्न केले म्हणून त्याचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याचा घाlपात झाल्याचा संशयही कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असले तरी त्या तरुणाचा अद्याप तपास लागलेला नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येतील आदिवासी समाजातील दीपक बर्डे याचे एका मुस्लिम युवतीसोबत प्रेमंबंध होते. मुलीच्या घरच्यांचा याला विरोध होता.

तरीही त्या दोघांनी परस्पर लग्न केले. याची माहिती मुलीच्या घरच्यांना कळाल्यावर त्यांनी दीपकला मारहाण केली. त्याच्या ताब्यातून त्या मुलीला घेऊन गेले आणि पुण्याला मामाकडे ठेवले.

याची माहिती मिळाल्यावर दीपक मित्रांसोबत पुण्याला गेला. तेथे गेल्यावर मुलीच्या मामाने दीपकला मारहाण करत अपहरण केले, असा आरोप त्याच्या मित्रांनी केला आहे.

त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणी तालुका पोलिसांकडून मजून शेख, इम्रान अब्बास शेख, समीर अहमद शेख, अजित शेख यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बेपत्ता दीपकचा तपास लागलेला नाही.