कोल्हापूर : समाजामध्ये पतीच्या निधनानंतर (death of her husband) पत्नीला (Wife) अनेक बंधने लागु केली जातात. त्यामुळे विधवा महिलांचा मानसिक छळ झाल्यासारखा असतो. मात्र याच प्रथेला २१ व्या शतकामध्ये मोडून काढण्यात आले आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हेरवाड (Herwad) गावात विधवा प्रथा बंद कायमची बंद करण्यात आली आहे. गावाच्या या निर्णयामुळे लोकांचे मतपरिवर्तन होत असल्याचे समजते आहे. तसेच गावाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक (decision is historic) आहे.

यामध्ये पतीच्या निधनानंतर महिलेच्या कपाळावरील कुंकू पुसणे, हातातील बांगड्या फोडणे या प्रथा आता बंद करण्यात आल्या आहेत. आज मातृदिनी हा महत्वाचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे यासाठी हेरवड गावाने हा मोठा पुढाकार घेतला असून सर्वांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. तसेच असा ठराव करणारी हेरवाड कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत (first Gram Panchayat) ठरली आहे.

दरम्यान, पती निधनानंतर महिलेचे मंगळसूत्र तोडण्यात येते, कुंकू पुसण्यात येते, बांगड्या वाढविल्या जातात, जोडवी काढण्यात येतात, त्याचबरोबर आयुष्यभर धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेता येत नाही, अशी सद्य:स्थिती आहे.

मात्र हेरवाड ग्रामपंचायतीमध्ये विधवा प्रथेला तीव्र विरोध करण्यात आला होता. ग्रामपंचायतीमध्ये विधवा प्रथेविरोधात ठराव करण्यात आला. हा ठराव मांडण्यात आला नाही तर तो बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. गावात यापुढे पतीच्या निधनानंतर विधवा प्रथेचे कोणतेच कार्यक्रम होणार नसल्याचा ठराव केला गेला.

ग्रामसभेत सर्वानुमते विधवा प्रथेला विरोध करण्यात आला होता. ग्रामसभेत सूचक आणि अनुमोदक महिला राहिल्या. आता ही प्रथा या गावातून हद्दपार झाली आहे. त्यामुळे या गावाचा आदर्श अन्य गावे घेतील, असा हा ऐतिहासिक निर्णय आहे.