file photo

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणूकीत शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

शिवसेनेचा उमेदवार कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात दमदार विजय मिळवला आहे. या विजयामुळे शिवसेनेने पहिल्यांदाच राज्याबाहेर भगवा फडकावला आहे.

कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51 हजार मतांनी विजय मिळवला. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 12 हजार 741 मतं मिळाली तर भाजपचे उमेदवार महेश गावित यांना 63 हजार 382 मतं मिळाली.

महेश गावित यांच्या पराभवामुळे भाजपाला मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे. आज सकाळी साडेआठ वाजता सुरु झालेली मतमोजणीत 22 फेऱ्या पार पडल्या.

दादरा नगर हवेलीच्या निमित्ताने शिवेसनेने राज्याबाहेर पहिल्यांदाच भगवा फडकावला. आजचा दिवस आनंदाचा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.