राशीभविष्य

Sun Transit: 330 वर्षानंतर कुंभ राशीत होणार सूर्य आणि शनीची युती! ‘या’ राशींच्या व्यक्तींची बिझनेस आणि करिअरमध्ये होईल भरभराट

Published by
Ajay Patil

Sun Transit:- कर्माची देवता म्हणून ओळखले जाणारे शनिदेव सध्या तब्बल तीस वर्षानंतर कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. जर आपण शनिदेवाचा विचार केला तर त्यांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी भरपूर दिवस लागतात.

त्यामुळे तीस वर्षानंतर ते कुंभ राशीत प्रवेश करत आहेत व महत्त्वाची बाब म्हणजे कुंभ राशीत सूर्य आणि शनि या दोन्ही महत्त्वाच्या ग्रहांची युती होणार असल्याने त्यांचा प्रभाव हा सर्व बारा राशींवर दिसून येणार आहे.

त्यातल्या त्यात जर आपण काही राशींचा विचार केला तर या दोन्ही ग्रहांच्या  होणाऱ्या युतीचा सकारात्मक परिणाम हा काही राशींवर दिसून येणार आहे.

या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींच्या करियर आणि बिजनेसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती होण्याची शक्यता आहे. नेमक्या त्या राशी कोणत्या आहेत? याबद्दलची माहिती या लेखात बघू.

 सूर्य आणि शनि देवाची युती या राशींसाठी ठरेल फलदायी

1- वृश्चिक- सूर्य देवाची जी काही गोचर स्थिती आहे हे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायद्याची ठरू शकणार आहे. सूर्य देवाचा हा राशि बदल वृश्चिक राशीच्या चौथ्या घरात होणार आहे व त्यामुळे या कालावधीत वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल.

तसेच ही व्यक्ती या कालावधीमध्ये वाहन आणि एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. या कालावधीत जर काही गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यावसायिक लोकांच्या व्यवसायामध्ये चांगले यश मिळेल.

2- सिंह- सूर्य देवाच्या गोचरमुळे सिंह राशींच्या व्यक्तींना खूप मोठा फायदा होणार आहे. कारण सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव असल्यामुळे व हे गोचर सिंह राशीच्या सातव्या घरात होणार असल्याने त्याचा सकारात्मक प्रभाव सिंह राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे

या कालावधीत सिंह राशींचे व्यक्तींचे जोडीदारासह नाते घट्ट होईल. तसेच आरोग्य देखील अगोदरपेक्षा खूप चांगले राहील व या स्थितीमुळे आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येईल. व्यावसायिक लोकांना खूप चांगला प्रकारे नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीबद्दल नशीब या व्यक्तींच्या बाजूने असण्याची शक्यता आहे.

3- मकर- सूर्य देवाचे राशी परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणार आहे. सूर्य देवाचे गोचर मकर राशीतून धन आणि वाणीच्या घराकडे होणार आहे. त्यामुळे  या व्यक्तींना अनपेक्षितरित्या  पैशांचा लाभ मिळू शकणार आहे.

काही विदेशी स्त्रोतांकडून देखील आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच आर्थिक फायदा तर मिळेलच परंतु लोकांकडून प्रशंसा देखील होईल.

अगोदरपेक्षा आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदार व्यक्ती असतील तर त्यांना अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित होतील व याचा भविष्यामध्ये खूप मोठा फायदा होईल.

( टीपवरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करीत नाहीत.)

Ajay Patil