Astro Tips:- ज्योतिषशास्त्राला भारतामध्ये खूप महत्त्व असून एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासून भारतामध्ये ज्योतिष शास्त्राला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. जीवनाच्या बाबतीत आपल्याला योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्याच्या दृष्टिकोनातून देखील ज्योतिषशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
व्यक्ती जीवन जगत असतो तेव्हा नकळतपणे काहीतरी चुका व्यक्तीकडून होत असतात व अशा चुका आयुष्यामध्ये अडचणी आणि अनेक समस्यांना निमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरतात. या दृष्टिकोनातून जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर आपल्याला केवळ या माध्यमातून भविष्याविषयी माहिती मिळते असे नाही तर जीवनात योग्य निर्णय घेण्याची एक दिशा देखील मिळते.
ज्योतिष शास्त्राच्या नियमांचे जर योग्य प्रकारे पालन केले तर जीवनामध्ये समृद्धी आणि यश तर मिळतेच. परंतु त्याशिवाय मानसिक शांती देखील मिळण्यास मदत होते. जीवनामध्ये आपण अनेक गोष्टींची देवाण-घेवाण करत असतो. परंतु अशा पद्धतीची देवाण-घेवाण करताना अशा काही वस्तू असतात की ज्या कधीही कुणाच्या घरून आपल्या घरी आणू नयेत.
कारण अशा गोष्टी घरी आणल्यानंतर त्यांचा जीवनावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते व काही समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या घरी आणल्याने नुकसान होऊ शकते याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.
कोणाच्याही घरून चुकून आणू नका या वस्तू
1- फर्निचर- समजा तुम्ही एखाद्या कडून जर जुने फर्निचर तुमच्या घरी आणले तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते व वास्तुदोष देखील होऊ शकतो. शास्त्रानुसार जुने फर्निचर घरात ठेवल्याने गरिबी आणि अशुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते.
असे मानले जाते की जुन्या फर्निचर मध्ये साठलेली नकारात्मक ऊर्जा नवीन घरात प्रवेश करते आणि घरातील सदस्यांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे कुटुंबातील सुख-समृद्धी कमी होऊ शकते आणि घरातील वातावरण नकारात्मक होऊ शकते. घरात जुने फर्निचर आणू नये.
2- चप्पल- इतरांची चप्पल घालणे हे केवळ अशुभ मानले जात नाही तर यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्योतिष शास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जा शरीराच्या सर्वात खालच्या भागातून म्हणजेच पायातून बाहेर पडते.
त्यामुळे जेव्हा आपण दुसऱ्याची चप्पल किंवा शूज घालतो तेव्हा आपण त्यांचे नकारात्मक ऊर्जा आपल्यात घेऊन येतो. या नकारात्मक ऊर्जामुळे आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊन जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून इतरांची चप्पल घालने टाळले पाहिजे.
3- छत्री- शास्त्रानुसार बघितले तर दुसऱ्याच्या घरून छत्री आणणे देखील शुभ मानले जात नाही. असे केल्यामुळे व्यक्तीच्या ग्रह स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडतो व काही कारणास्तव छत्री तुम्हाला घरी आणावीच लागली तरी ती घरात आणू नये. ती वापरल्यानंतर त्वरित परत करणे गरजेचे आहे. घरात दुसऱ्याची छत्री आणल्याने नकारात्मक ऊर्जा येते आणि ग्रहांचे संतुलन देखील बिघडते.