Numerology:- नवीन वर्षाचे आगमन आता काही दिवसांवर आले असून प्रत्येकाला आता या नवीन वर्षाच्या स्वागताची उत्सुकता लागून आहे. ज्याप्रमाणे बऱ्याच व्यक्तींना नवीन वर्षाची सुरुवात ही काही बाबतीमध्ये खूप महत्त्वाची असते अगदी त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील काही व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष भाग्यवान ठरू शकते.
जर आपण ज्योतिषशास्त्र सारखाच अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून जरी बघितले तरी देखील अंक शास्त्रानुसार काही लोकांसाठी येणारे हे नवीन वर्ष खूप भाग्यवान आणि आर्थिक दृष्टिकोनातून देखील फायद्याचे ठरणार आहे.
येणारे 2025 हे नवीन वर्ष काही जन्मतारखांच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. त्यामुळे अशा कोणत्या भाग्यशाली जन्मतारखा आहेत, त्यांच्याकरिता हे येणारे वर्ष फायद्याचे ठरणार आहे त्याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.
कोणत्या जन्म तारखांना येणारे वर्ष ठरेल फायद्याचे?
1- जन्मतारीख 4, 13,22 आणि 31- अंकशास्त्रानुसार बघितले तर या दिलेल्या तारखांना जन्म झालेल्या लोकांचा मुलांक हा चार असतो. चार मुलांक असलेल्या व्यक्तींसाठी येणारे वर्ष खूप शुभ असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर चार हा अंक राहूशी संबंधित आहे व त्यामुळे या लोकांच्या आयुष्यामध्ये कधीकधी खूप मोठ्या समस्या किंवा गोंधळ निर्माण होतो.
परंतु 2025 मध्ये हे लोक यशस्वी होणार असून ज्या व्यक्तींना व्यवसायाची आवड आहे त्यांच्यासाठी देखील हे वर्ष भाग्याचे ठरणार आहे. तसेच येणाऱ्या या नवीन वर्षात पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याच्या संधी मिळतील. कुटुंब आणि जोडीदारासोबत बरेच आनंदाचे क्षण घालवू शकाल.
2- जन्मतारीख 6, 15 आणि 24- अंकशास्त्रानुसार या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मुलांक सहा असतो व या लोकांसाठी हे वर्ष अतिशय भाग्याचे ठरणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर सहा या मुलांकाचा स्वामीग्रह शुक्र असून शुक्राला आकर्षणाचा ग्रह असे म्हटले जाते.
यावर्षी या व्यक्तींना स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या संधी प्राप्त होतील व सुख सोयीं देखील मोठ्या प्रमाणावर मिळतील. तसेच येणाऱ्या वर्षांमध्ये नवीन घर किंवा कार खरेदी करण्याची संधी मिळेल. नातेसंबंधांमध्ये थोडे चढ-उतार येऊ शकतात.परंतु शेवटी सर्व काही व्यवस्थित होईल.
3- जन्मतारीख 8, 17 आणि 26- अंकशास्त्रानुसार या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 8 असतो व या अंकाचा स्वामी हा शनी आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात आठ मुलांक असलेल्या व्यक्तींवर शनीच्या प्रभाव असणार आहे व त्यामुळे अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यास मदत होईल.
परंतु प्रयत्न थोडे जास्त करावे लागतील. परंतु येणाऱ्या वर्षांमध्ये तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल व त्याकरिता मात्र तुम्हाला संयम बाळगणे गरजेचे राहील. आर्थिक स्थिती देखील चांगली राहील.
4- जन्मतारीख 9, 18 आणि 27- या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 9 असून या लोकांसाठी येणारे वर्ष खूप भाग्याचे ठरणार आहे. नऊ अंकाचा अधिपती ग्रह मंगळ असून मंगळाला धैर्य आणि शक्तीचा कारक म्हणून ओळखले जाते.
त्यामुळे त्यांचे जुने अपूर्ण काम या येणाऱ्या वर्षात पूर्ण होणार आहे व कामांमध्ये यश मिळेल. या जन्मतारखांना जन्म झालेले व्यक्ती नोकरी किंवा व्यवसायात असतील तरी त्यांना चांगला काळ येईल. कुटुंबामध्ये आनंदी आनंदाचे वातावरण राहील व आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणावर होईल.
( टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या माहिती विषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा अथवा या माहितीचे समर्थन करत नाही.)