Gaj Kesari Rajyog:- ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन याला खूप महत्त्व आहे. कारण जेव्हा अशाप्रकारे ग्रहांचे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये परिवर्तन होते. अशावेळी त्या राशी परिवर्तनाचा चांगला किंवा वाईट परिणाम हा 12 राशींवर होत असतो व त्यामुळे ग्रहांच्या या राशी परिवर्तनाच्या स्थितीला ज्योतिष शास्त्रामध्ये अतिशय महत्त्व आहे.
आता ग्रहांच्या दृष्टिकोनातून बघितले तर ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्र हा असा ग्रह समजला जातो की तो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये अतिशय वेगाने फिरतो व त्याच्या या वैशिष्ट्यामुळे तो कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडलेला असतो. त्यामुळे शुभ किंवा काही अशुभ योग देखील निर्माण होत असतात.
सध्याची जर आपण स्थिती बघितली तर ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रह सध्या वृषभ राशीमध्ये आहे व जेव्हा चंद्र आणि गुरू एकाच राशीमध्ये येतात तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर गजकेसरी राजयोगाला खूप शुभ असे म्हटले जाते व हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींकरिता खूप भाग्याचा आणि सुख समृद्धीचा ठरतो.
सध्या 13 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या नंतर चंद्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार असून या राशीत आधीच गुरु ग्रह असल्याने हे दोन्ही ग्रह एकत्र आल्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होत आहे. हा तयार होणारा राजयोग तीन राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे.
गजकेसरी राजयोग या तीन राशींसाठी ठरेल फायद्याचा
1- कन्या राशी- तयार होणारा हा गजकेसरी राजयोगामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना खूप मोठा फायदा होणार आहे. या व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये त्यांच्या आई-वडिलांचा पाठिंबा मिळणार आहे. ज्या ठिकाणी काम करत असाल त्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी खांद्यावर येईल.
तसेच अचानकपणे धनलाभ होण्याची देखील दाट शक्यता या कालावधीत आहे. तुमच्या कामाचे देखील खूप मोठे कौतुक केले जाईल व त्यामुळे मानसन्मान वाढीस लागेल. वैवाहिक जीवनामध्ये काही ताणतणाव असतील तर ते देखील दूर होतील. अनेक प्रकारच्या भौतिक सुख सुविधांची प्राप्ती होईल.
या कालावधीमध्ये या व्यक्तींना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी कमी होण्यास देखील मदत होईल आणि अडचणी आल्या तरी त्या तुम्ही दूर करण्यासाठी सक्षम असाल.
2- वृश्चिक राशी- तयार होणारा हा गजकेसरी राजयोग या राशीच्या व्यक्तींसाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अचानकपणे धनलाभाचे योग आहेत तसेच तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला वेळ या कालावधीत घालवू शकाल. तसेच उत्पन्नामध्ये देखील वाढ होईल.
तसेच या कालावधीमध्ये कुटुंबात आनंदी आनंदाचे वातावरण राहील व आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. तसेच काही मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.
या व्यक्तींचे त्यांच्या जोडीदारांसोबतचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होईल व तुमच्यावर कर्ज असेल तर ते फेडण्यास देखील मदत या कालावधीत होणार आहे. तसेच अनेक नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी प्राप्त होईल. एकदरीतपणे कुटुंबामध्ये आनंदी आनंदाचे वातावरण राहील.
3- वृषभ राशी- या राशीच्या लग्न भावामध्ये गजकेसरी राजयोग तयार होत असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना मनासारखी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे व धनसंपत्ती देखील वाढेल. कित्येक दिवसापासून पैसे अडकलेले असतील तर ते देखील परत मिळतील.
आयुष्यामध्ये अनेक बदल पाहायला मिळतील व समाजात मानसन्मान वाढीस लागेल. विशेष म्हणजे या कालावधीत आर्थिक स्थिती मजबूत व्हायला मदत होईल. खाजगी आयुष्यामध्ये प्रगती होईलच परंतु त्यासोबत प्रोफेशनल आयुष्यात देखील मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे व प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. जे व्यक्ती अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येतील व लग्न ठरेल. इतकेच नाही तर या कालावधीत मित्रांसोबत पिकनिकचा प्लॅन देखील बनवू शकतात.