Gaj kesari Rajyog:- नवीन वर्ष सुरू झाले असून या नवीन वर्षामध्ये वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर अनेक ग्रह विशिष्ट कालावधीत राशी परिवर्तन करणार आहेत. या राशी परिवर्तनामुळे वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारचे शुभ किंवा अशुभ परिणाम बघायला मिळतील.
एवढेच नाही तर ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे या नवीन वर्षामध्ये अनेक शुभ योग तयार होणार आहेत व त्यासोबत काही अशुभ योग देखील तयार होणार आहेत व त्याचा नक्कीच मानवी जीवनावर परिणाम होणार आहे. जर आपण या राजयोगाचा विचार केला तर गुरु ग्रह सध्या मेष राशीत प्रवेश करत असून अगोदरच 18 ऑक्टोबर पासून चंद्र हा या मेष राशीत आहे.
त्यामुळे चंद्र व गुरु यांच्या संयोगातून गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. हा एक शुभ राजयोग मानला जातो व नक्कीच या राजयोगाचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पडणार असून त्यांचे नशीब उजळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लेखात आपण गजकेसरी राज योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे? याबद्दलची माहिती घेऊ.
गजकेसरी राजयोगामुळे या तीन राशींचे चमकेल नशीब
1- मिथुन– गजकेसरी राजयोग हा मिथुन राशींच्या व्यक्तींकरिता अनुकूल ठरण्याची शक्यता असून या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी हा राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे मिथुन राशींच्या व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे व एवढेच नाही तर उत्पन्नाचे अनेक नवीन स्त्रोत देखील निर्माण होण्याची शक्यता आहे
जे लोक व्यवसाय करत असतील त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. अविवाहित असलेल्या व्यक्तींसाठी लग्नाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात. तुम्हाला या कालावधीत गुंतवणुकीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. तसेच वडील आणि वडिलोपार्जित मालमत्तेतून देखील सुख मिळेल अशी शक्यता आहे.
2- मीन– मीन राशींच्या व्यक्तींकरिता हा राजयोग चांगला आणि शुभ आहे. मीन राशीच्या गोचरकुंडलीतील धन आणि वाणी घरावर हा राजयोग तयार होणार असल्यामुळे वेळोवेळी या राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित पणे पैसे मिळण्याची शक्यता आहे. तसेच कुठे पैसे अडकले असतील तर ते देखील परत मिळण्याची शक्यता आहे.
व्यवसायिक लोकांना व्यवसाय मध्ये चांगला नफा आणि प्रगती होणार आहे. तसेच या राशीच्या व्यक्तींची सामाजिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा व प्रभाव वाढण्यास मदत होईल. पण या राशींच्या व्यक्तींकरिता महत्वाचे म्हणजे शनीची साडेसाती चालू असल्यामुळे काही निर्णय विचार करून घेणे गरजेचे राहील.
3- धनु– धनु राशींच्या व्यक्तींकरिता गजकेसरी राजयोग फायद्याचा ठरणार आहे. हा राजयोग या राशीतून पाचव्या घरात तयार होणार असल्यामुळे या राशींच्या व्यक्तींना मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
म्हणजेच मुलांना नोकरी लागू शकते किंवा लग्न जमू शकते. तसेच या कालावधीत या राशींच्या व्यक्तींचे मन हे कमाई व कामाच्या ठिकाणी होत असलेल्या प्रगतीमुळे आनंदित राहील. तसेच अनपेक्षित पैसे देखील मिळण्याची शक्यता आहे व यावेळी या राशींच्या व्यक्तींना सन्मानाने प्रतिष्ठा देखील मिळण्याची शक्यता आहे.
( टीप– वरील माहिती ही ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. याविषयी कुठल्याही प्रकारचा आम्ही दावा करत नाहीत.)