राशीभविष्य

Shani Sade Sati: शनि देवाच्या अस्तासह ‘या’ राशींना मिळणार साडेसातीतून मुक्तता आणि श्रीमंतीचा मार्ग होईल मोकळा!

Published by
Ajay Patil

Shani Sade Sati:- जर आपण ज्योतिषशास्त्रानुसार विचार केला तर शनी हा सर्वात कमी वेगाने मार्गक्रमण करणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या ग्रहाचा चार राशींवर प्रभाव होतो तो बदलण्यासाठी काही ठराविक कालावधी लागत असतो.

त्यामुळे शनिदेव वक्री तसेच मार्गी होण्याचे, यासोबतच अस्त आणि उदयामुळे बारा राशींपैकी काही राशींच्या कुंडलीतील साडेसाती किंवा अडीच वर्षाचा कालावधी म्हणजेच ढया कालावधीतील जो काही प्रभाव असतो तो कमी होतो.

अगदी याच पद्धतीने आता या 2024 वर्षांमध्ये 3 फेब्रुवारीला शनि महाराजांचा अस्त झाला असून  साधारणपणे ही परिस्थिती 9 मार्चपर्यंत असणार आहे व नऊ मार्चला पुन्हा कुंभ राशीमध्ये शनि महाराजांचा उदय होणार आहे.

परंतु 3 फेब्रुवारीला शनि देवाचा अस्त झाल्यामुळे काही राशींवर जो काही साडेसातीचा प्रभाव होता तो आता संपणार आहे व अशा राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नेमके या राशी कोणत्या आहेत व त्यांना कसा फायदा होणार आहे? याबद्दलची माहिती बघू.

 या राशींची झाली साडेसातीतून मुक्तता

 शनि देवाचा अस्त झाल्यामुळे मीन राशींची जे व्यक्ती आहेत त्यांची अशुभ प्रभावातून सुटका होण्याची शक्यता आहे. तसेच कुंभ राशीतील शनिच्या प्रभावाचा दुसरा टप्पा व मकर राशीत तिसरा टप्पा सुरू होणार असल्यामुळे या दोन्ही राशींच्या व्यक्तींचे काहीसे कष्ट कमी होण्याची शक्यता आहे.

तसेच मकर, कुंभ आणि मीन राशीला शनिच्या प्रभावातून मोकळी वाट मिळाल्यामुळे त्यांना प्रगतीच्या संधी मिळण्याची देखील शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या राशींच्या व्यक्तींना मानसिक शांतता मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे.

मनावरील ताण-तणाव दूर झाल्यामुळे समाधानाने आयुष्य घालवता येणार आहे. तसेच या तीनही राशींच्या व्यक्तींनी काही गुंतवणूक केली असेल तर अचानकपणे त्यांना धनलाभ होण्याची शक्यता देखील आहे. एवढेच नाही

आरोग्यात देखील चांगली सुधारणा दिसून येऊ शकते. तसेच या व्यक्तींना परदेशात प्रवासाचे संधी मिळण्याची शक्यता असून व्यवसायाच्या विषयी एखादा करार किंवा डील असेल तर ती पूर्ण होऊ शकते.

 या राशींवरील अडीच वर्षाचा प्रभाव देखील होईल कमी

 तसेच शनि देवाचा कुंभ राशीमध्ये अस्त झाल्यामुळे कर्क व वृश्चिक या दोन्ही राशींच्या व्यक्तींवरील अडीच वर्षाचा जो काही शनिचा प्रभाव असतो त्यालाच आपण ढया प्रभाव असे देखील म्हणतो तो देखील कमी होणार आहे.

हा अडीच वर्षाचा कालावधी असतो परंतु यामध्ये अधिक तीव्र स्वरूपाचा प्रभाव असतो असे देखील म्हटले जाते. त्यामुळे कर्क व वृश्चिक राशींचा हा कालावधी संपुष्टात आल्यामुळे या राशींच्या व्यक्तींचे बरीच कामे मार्गे लागण्याची शक्यता आहे.

या अगोदर जर काही कारणांमुळे कामे पूर्ण झाली नसतील तर ती आता पूर्ण होणार आहेत. व्यवसायाला सुद्धा या कालावधीमध्ये गती मिळणार आहे.

Ajay Patil