राशीभविष्य

मार्चच्या ‘या’ तारखेपासून बुध उदय होत असल्याने या राशींना मिळेल शुभ फळ! यामध्ये आहे का तुमची राशी? वाचा माहिती

Published by
Ajay Patil

 आपल्याला माहित आहेच की प्रत्येक ग्रह काही ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतो. जेव्हा ग्रह असे परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा एका राशीत उदय आणि अस्त या दोन गोष्टी घडत असतात.

अगदी याच पद्धतीने आठ फेब्रुवारीला बुध मकर राशीमध्ये अस्त झाला व 15 मार्चला मीन राशीत बुधचा उदय होणार आहे.

त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार पाहिले तर बुध ग्रहाचा या उदयामुळे काही राशींना खूप मोठा फायदा येणाऱ्या दिवसात दिसून येणार आहे. नेमका बुधचा उदय झाल्याने कोणत्या राशींना चांगला फायदा किंवा शुभ फळ मिळणार आहे? याबद्दलची माहिती घेऊ.

 बुध ग्रहाच्या उदयामुळे या राशींना मिळेल भरपूर पैसा?

1- कर्क- बुधचा उदय कर्क राशींच्या व्यक्तींसाठी खूप शुभ फळ देणारा ठरणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या या राशींच्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळणार असून मालमत्तेच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून भरपूर आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे.

तसेच या कालावधीमध्ये काम आणि व्यवसायामध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता असून  वेळोवेळी अनपेक्षितपणे पैसे देखील मिळतील अशी देखील शक्यता आहे. विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या कालावधीत आनंदाची बातमी मिळू शकते.

2- वृषभ- या राशींच्या व्यक्तींना बुधाच्या उदयामुळे खूप मोठा फायदा मिळणार असून या कालावधीत कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला पैसे मिळू शकणार आहेत.

व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये बदल होतील व व्यवसायात वाढ देखील होण्याची शक्यता असून कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जाण्याची देखील संधी मिळणार आहे.

तसेच नोकरीच्या चांगल्या संधी देखील चालून येऊ शकतात. या कालावधीमध्ये या राशींच्या लोकांना चांगली आर्थिक कमाई करण्याची संधी मिळू शकते व कौटुंबिक जीवनामध्ये देखील आनंदी आनंद राहण्याची शक्यता आहे.

3- मिथुन- मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचा उदय खूप शुभदायी ठरणार असून या राशींच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होऊन आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकणार आहे.

काही नवीन योजनांवर काम कराल तर त्या माध्यमातून देखील खूप मोठा फायदा मिळवू शकणार आहे. तसेच मिथुन राशींच्या व्यक्तींना जोडीदाराकडून योग्य सहकार्य मिळण्याची शक्यता देखील आहे.

( टीपवरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाहीत.)

Ajay Patil