Vipreet Rajyog:- ग्रहांचे राशी परिवर्तन म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे हे एका ठराविक कालावधीनंतर घडत असते. म्हणजेच या ठराविक कालावधीनंतर ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत बदल करत असतात. परंतु ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर ग्रहांच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव हा संपूर्ण बारा राशींवर चांगल्या किंवा वाईट पद्धतीने पडताना आपल्याला दिसून येतो. तसेच ग्रहांच्या या राशी बदलामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग देखील तयार होतात.
या योगाचा परिणाम देखील प्रत्येक व्यक्तीवर होत असतो. याच मुद्द्याला धरून जर आपण बुध ग्रहाचा विचार केला तर बुध ग्रहाने 20 फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश केल्यामुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर या विपरीत राज योगामुळे काही राशींना खूप मोठा फायदा होणार आहे. नेमक्या या राशी कोणत्या आहेत? याबद्दलची माहिती या लेखात बघू.
विपरीत राजयोगामुळे या राशी होतील श्रीमंत?
1- कन्या– यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना खूप शुभ फळ मिळणार असून यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. जे व्यक्ती सरकारी नोकरीची तयारी करत असतील अशा व्यक्तींना यश मिळण्याची शक्यता आहे.तसेच करिअर मध्ये देखील प्रगती होऊ शकते.
कन्या राशीचे जे व्यक्ती व्यावसायिक असतील त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये काही महत्त्वाची प्रकल्प मिळू शकणार आहेत. तसेच अनपेक्षितपणे काही पैसे मिळण्याची देखील शक्यता आहे. काही कोर्टकचेरीचे प्रकरण असतील तर त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळण्याची शक्यता असून समाजामध्ये मानसन्मान वाढीस लागणार आहे.
2- धनु– या राज योगामुळे धनु राशींच्या लोकांसाठी खूप मोठा फायदा होणार आहे. धनु राशीचे जे व्यक्ती व्यापारात असतील त्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता असून आर्थिक फायदा, पद आणि प्रतिष्ठा देखील वाढीस लागणार आहे.
करियर आणि व्यवसायामध्ये या कालावधीत प्रगती होईल आणि उत्पन्नात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन मालमत्ता खरेदी करायची असेल तर चांगला योग जुळून येऊ शकतो. या राशीच्या व्यक्तींची या कालावधीत आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
3- कर्क– विपरीत राज योगामुळे कर्क राशींच्या व्यक्तींना खूप मोठा फायदा होणार आहे. तसेच व्यापारी असलेल्या व्यक्तींना या काळात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तुमचे पैसे रोखले गेले असतील किंवा अडकलेले असतील तर ते परत मिळू शकतात.
कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना या कालावधीत कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळण्याची शक्यता असून नोकरदार वर्गाला प्रमोशन आणि पगारवाढीचा फायदा मिळू शकतो. शेअर्समध्ये आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता असून उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात.
( टीप– वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. याविषयी कुठल्याही प्रकारचा दावा आम्ही करत नाहीत.)