Guru gochar : 31 डिसेंबर पासून ‘या’ 3 राशींच्या जीवनात आनंदच-आनंद; देव गुरुची असेल विशेष कृपा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Guru gochar : वर्ष 2023 च्या शेवटी काही ग्रहांमध्ये विशेष बदल घडून येणार आहे, ज्याचा परिणाम थेट मानवी जीवनात होणार आहे. ग्रहांना हिंदू धर्मात खूप महत्व आहे. प्रत्येक ग्रह हा विशिष्ट राशीशी संबंधित आहे. म्हणून ग्रह जेव्हा हालचाल करतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो, आणि त्याच्या जीवनात अनेक बदल घडून येतात.

अशातच देवतांचा गुरू, गुरू आपला मार्ग बदलेल, ज्याचा परिणाम अनेकांवर दिसून येईल. ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांपैकी गुरूला सर्वात मोठे महत्त्व मानले जाते. गुरु हा ज्ञान, बुद्धी, अध्यात्म, शिक्षण, संपत्ती आणि धर्माचा कारक मानला जातो. तो धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. अशातच 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7:08 वाजता गुर मेष राशीत मार्गी होईल. ज्याचा परिणाम अनेक राशींवर दिसून येईल.

काही राशींना गुरुदेवांचा आशीर्वाद मिळेल, त्यांना संतती, संपत्ती आणि सन्मान मिळेल. तर काही राशींवरही नकारात्मक प्रभाव पडेल. गुरु मार्गी असल्यामुळे तीन राशींना सर्वाधिक फायदा होईल. कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी चला पाहूया…

धनु

धनु राशीच्या पाचव्या भावात गुरु ग्रहाचे भ्रमण होईल. ज्यामुळे धनु राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. या काळात विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे, तसेच आत्मविश्वास देखील वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. ज्यामुळे मन शांत होईल. नवीन वर्षाची सुरुवात शुभ राहील.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी बृहस्पति ग्रह मार्गीअसणे शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात आर्थिक लाभ आणि यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत धार्मिक सहलीचे नियोजन करू शकता. त्यामुळे कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. बर्‍याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. बँक बॅलन्स वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पदोन्नतीची शक्यता आहे.

मेष

मेष राशीच्या लोकांवर बृहस्पति दयाळू असेल. नवीन वर्ष नवा उत्साह आणि अपेक्षा घेऊन येईल. अपयश येण्याची शक्यता आहे. पण खचून जाऊ नका. मेहनत करत राहा. या काळात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि करिअरमध्ये फायदा होईल. पदोन्नतीची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. एकूणच येणारे वर्ष खास असेल.