Indicators Of Bad Time By Astro:- ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे ग्रहांचा किंवा इतर नक्षत्रांचा व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास केला जातो व त्याची माहिती आपल्याला मिळत असते. अगदी याच पद्धतीने याहीपेक्षा पुढे जात काही महत्त्वाच्या विषयांवर देखील आपल्याला विवेचन केलेले आढळून येते.
ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या उद्भवतात आणि त्या मागील कारणे देखील सांगितले जातात व त्यावरील उपाय योजना देखील आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सापडतात.
अगदी त्याच पद्धतीने घरामध्ये जर काही वाईट घटना घडणारी असेल तर त्याबाबतचे काही चिन्हे किंवा कुठले संकेत आपल्याला मिळत असतात याबद्दलची माहिती देखील ज्योतिष शास्त्रामध्ये मिळते.
ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर घरामध्ये जर काही वाईट काळ सुरू होणार असेल किंवा वाईट गोष्ट घडणार असेल तर अगोदर आपल्याला त्याविषयी काही महत्वाचे संकेत अगोदरच मिळायला लागतात. त्याविषयीची माहिती थोडक्यात बघू.
या संकेतांमुळे लागू शकते घरात येणाऱ्या वाईट वेळेची चाहूल
1- घरामध्ये उंदीर येणे- घरामध्ये उंदीर येणे हे तसे पाहायला गेले तर एक स्वाभाविक गोष्ट असून यामध्ये विशेष असे काही नाही. परंतु अचानकपणे जर जास्त प्रमाणामध्ये काळे उंदीर येऊ लागले किंवा दिसायला लागले तर या माध्यमातून हे सुचित होते की भविष्यात काहीतरी मोठे संकट येण्याची शक्यता आहे.
2- सोन्याच्या वस्तूंचे नुकसान होणे- सोन्याच्या दागिना बऱ्याचदा हरवतो व ही देखील एक सामान्य गोष्ट आपण समजतो. परंतु ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर सोन्याची वस्तू गमावणे किंवा हरवणे हे शुभ मानले जात नाही. सोन्याचा दागिना किंवा सोने हरवले तर घरामध्ये नकारात्मकता यायला सुरुवात होते असा एक समज आहे. तुमचे सोने हरवले तर घरात नकारात्मकता येते.
3- भिंतीवर पालींचे भांडण- पाली घरामध्ये आपल्याला आढळून येतात. परंतु यामध्ये जर दोन पाली भिंतीवरच एकमेकांशी भांडत असतील तर ते एक नकारात्मकतेचे लक्षण आहे. ज्योतिष शास्त्रानुसार अशाप्रकारे घरामध्ये पालींचे भांडण होणे हे अशुभ मानले जाते व हे देखील वाईट वेळ येण्याचा एक संकेत आहे.
4- घरामध्ये तूप सांडणे किंवा तुपाचा डबा सांडणे- घरामध्ये जर तुपाचा डबा असेल आणि तो हातातून पडला आणि तूप जर जमिनीवर पसरले तर या माध्यमातून सूचित होते की तुमच्यावर वाईट वेळ येण्याची शक्यता आहे.
5- सुकलेली तुळस- ग्रामीण भाग असो की शहरी भाग आपल्याला घराच्या अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये हिरवीगार असे तुळसचे रोप पाहायला मिळते.
तुळशीला एक आध्यात्मिक महत्त्व देखील आहे व घरातील वातावरण प्रसन्न आणि शुद्ध ठेवण्यासाठी देखील तूळस महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. परंतु अंगणामध्ये तुळस आहे व ती जर वाळलेली असेल तर हे एक नकारात्मक लक्षण आहे व वाईट वेळ येण्याचा संकेत देखील या माध्यमातून आपल्याला मिळत असतो.
( टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या माहितीविषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा अथवा या माहितीचे समर्थन करत नाही.)