Budh Gochar : नऊ ग्रहांमध्ये बुध शुभ ग्रह मानला जातो. बुधला ग्रहांचा राजकुमार देखील म्हंटले जाते. बुध हा बुद्धिमत्ता, गणित, हुशारी आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. तसेच हा ग्रह मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. अशातच ९ एप्रिल रोजी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे.
तुमच्या माहितीसाठी मीन राशीचा स्वामी बृहस्पति गुरु आहे. अशातच बुधाच्या या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर परिणाम होईल. पण चार याचा राशींवर शुभ परिणाम दिसून येईल.
मकर
या काळात मकर राशीच्या लोकांना प्रमोशन मिळेल. व्यावसायिकांसाठीही हा काळ शुभ राहील. आर्थिक बाजू मजबूत राहील. विद्यार्थी आणि जोडप्यांसाठी हा काळ थोडा कठीण आहे, परंतु बुधवारी गाईला पालक खाऊ घातल्यास समस्या दूर होऊ शकतात.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण शुभ राहील. तसेच या काळात उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीत फायदा होईल. व्यवसायाचा विस्तार होईल. मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांसाठीही हा काळ शुभ राहील. प्रवासाची शक्यता आहे. तुमच्यावर कामाचा ताण असेल, पण तुमच्या मेहनतीचे फळ भविष्यात मिळेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत लाभ होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल.
मीन
मीन राशीच्या लोकांनाही बुध ग्रहाची विशेष कृपा लाभणार आहे. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. हिरव्या वस्तूंचे दान केल्याने तुम्हाला अधिक लाभ मिळेल.