Numerology :- हनुमानजी हे हिंदू धर्मातील अतिशय पूजनीय देवता असून त्यांना महाबली, पवनपुत्र आणि संकटमोचक या नावांनी ओळखले जातात.त्यांच्या भक्तांसाठी ते नेहमीच संकटातून मुक्त करणारे आणि सुखशांती प्रदान करणारे ठरतात. मान्यता अशी आहे की, काही विशिष्ट जन्मतारीख असलेल्या व्यक्तींवर हनुमानजींची विशेष कृपा असते. या तारखांमध्ये जन्मलेल्या लोकांचे जीवन त्यांच्या आशीर्वादाने अधिक यशाने भरलेले असते.
ह्या व्यक्तींवर असते विशेष कृपा
ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर विशेषत: मंगळवार आणि शनिवार या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींवर हनुमानजींची कृपा अधिक असते. हनुमानजींना मंगळाचे अधिष्ठाता मानले जाते, त्यामुळे मंगळवार हा त्यांचा विशेष प्रिय दिवस मानला जातो.
या दिवशी जन्मलेल्या लोकांना आयुष्यात ज्या अडचणी येतात, त्या हनुमानजींच्या आशीर्वादाने लवकरच सुटतात. याशिवाय, चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला जन्मलेल्या लोकांवरही त्यांच्या कृपेचा वर्षाव होत असल्याचे मानले जाते, कारण हा दिवस हनुमान जयंतीचा असतो.
हनुमानजींची भक्ती फायद्याची
हनुमानजींच्या भक्तांना जीवनात अनेक प्रकारचे लाभ होतात. त्यांच्या कृपेने व्यक्तीचे आत्मबल वाढते, भीती कमी होते, आणि मनोबलात सुधारणा होते. संकटसमयी त्यांच्या स्मरणाने भक्तांना अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. याशिवाय, हनुमानजींच्या आराधनेमुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अडचणी दूर होतात.
हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे नियमित पठण करणे हा भक्तांसाठी महत्त्वाचा उपाय मानला जातो. यामुळे भक्तांवर हनुमानजींचा कृपाशिर्वाद राहतो. विशेषत: मंगळवारी किंवा शनिवारच्या दिवशी त्यांची आरती किंवा उपवास केल्यानेही त्यांची कृपा अधिक प्रमाणात मिळते.
जन्मतारीख आणि व्यक्तिमत्व
ज्या लोकांचा जन्म हनुमानजींशी संबंधित तिथी किंवा दिवशी झाला आहे, ते लोक साहसी, मनोबलाने संपन्न आणि सतत प्रगतीशील असतात. त्यांना जीवनात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता असते. त्यांचा स्वभाव सहृदय असून ते नेहमीच इतरांना मदत करण्यासाठी पुढे येतात.
हनुमानजींच्या आशीर्वादाने यश
हनुमानजींच्या कृपेने जीवनात येणाऱ्या संकटांवर मात करण्याची क्षमता मिळते. त्यांच्या आशीर्वादाने भक्तांचे आरोग्य चांगले राहते, आर्थिक स्थिती मजबूत होते आणि करियरमध्ये यश मिळते. त्यांच्या स्मरणाने व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते.
हनुमानजींच्या आराधनेचे महत्त्व काय?
हनुमानजींच्या कृपेने भक्तांना अडचणींचा सामना करण्याचे बळ मिळते. त्यांची उपासना केल्याने व्यक्तीचे जीवन शांत, सुखमय आणि यशस्वी होते. ज्या लोकांचा जन्म त्यांच्या विशेष तिथींमध्ये झाला आहे.
त्यांच्यासाठी हनुमानजींचे स्मरण आणि पूजा अधिक लाभदायक ठरते. शेवटी, हनुमानजींच्या कृपेमुळे भक्तांचे जीवन आनंदी होते आणि ते कधीही एकटे राहात नाहीत. त्यांच्या स्मरणाने भक्तांचे जीवन अधिक यशस्वी, सुखी आणि शांततेने भरलेले होते