ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्राला महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे अंक ज्योतिषशास्त्राला देखील तितकेच महत्त्व आहे. अंकज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झालेला असतो त्या तारखेवरून त्या व्यक्तीचा मुलांक काढला जातो व त्या मुलांकावरून संबंधित व्यक्तीचे भविष्यकालीन आयुष्य किंवा त्याचेव्यक्तिमत्व कशा पद्धतीचे असते? याबाबतची माहिती आपल्याला मिळत असते.
व्यक्तीच्या मुलांक जर काढायचा म्हटला म्हणजे त्याच्या जन्मतारखेतील दोन अंकांची बेरीज केली जाते व जे उत्तर येते ते संबंधित व्यक्तीचा मुलांक असतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर समजा तुमची जन्मतारीख जर कोणत्याही महिन्याच्या 21 तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक हा 2+1=3 येतो.
याप्रमाणेच ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 13, चार तसेच 22 किंवा 31 तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक हा चार असतो. त्यामुळे या लेखामध्ये चार मुलांक असलेले लोक कसे असतात किंवा त्यांचे व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचे असते? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
कोणत्याही महिन्याच्या चार, 13 तसेच 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व कसे असते?
1- आयुष्यामध्ये बिनधास्त असतात– ज्या लोकांचा मुलांक चार असतो असे लोक आयुष्यामध्ये खूप बिनधास्त असतात व ते बिनधास्त जीवन जगतात व तशा प्रकारचे जीवन जगायला त्यांना आवडते. चेष्टा मस्करी करणे हा या लोकांचा स्वभाव असतो.
तसेच ते कोणत्याही गोष्टीची चिंता करत नाहीत. समाजामध्ये असताना त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर मित्र असतात व लोकांमध्ये राहणे यांना खूप आवडते. नियम आणि वेळ यांचे हे लोक खूप पक्के असतात व आपलं काम वेळेत पूर्ण करण्याची त्यांची सवय असते व फिरण्याची आवड देखील त्यांना असते.
2- रहस्यमयी विषयांमध्ये असतात इंटरेस्टेड– चार मुलांक असणाऱ्या लोकांवर राहूचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ही व्यक्ती रहस्यमयी विषयांमध्ये जास्त आवड दाखवतात. यांना बऱ्यापैकी सर्व विषयांची माहिती असते व माहितीचा साठा जास्त असल्यामुळे इतर लोकांना ते पटकन स्वतःकडे आकर्षित करतात.
त्याचे म्हणजे स्वभावाने देखील हे जिद्दी असतात. एवढेच नाही तर चार मुलांक असलेल्या लोकांवर सूर्याचा प्रभाव असल्याने ते फार साहसी आणि कुशाग्र बुद्धीचे देखील असतात.
3- संशयी स्वभावाचे असतात– या लोकांचा एक सगळ्यात मोठा कमजोर पॉईंट म्हणजे हे लोक प्रचंड संशयी स्वभावाचे असतात. अनेकदा त्यांचा संशयी स्वभावच त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करतात व हाच गैरसमज त्यांच्या संशयी स्वभावामुळे त्यांचे नातेसंबंध देखील तुटण्याची वेळ येते.
एकदा या स्वभावामुळे त्यांच्यापासून लोक दूर होतात. बऱ्याचदा या जन्म तारखांना जन्मलेल्या लोकांवर स्वभावामुळे पश्चाताप करण्याची वेळ देखील येते.
( टीप– वरील माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती वाचकांकरिता फक्त माहितीसाठी सादर केलेली आहे. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाहीत किंवा समर्थन देखील करत नाहीत.)