मोहिनी एकादशीला ‘या’ राशींवर होणार लक्ष्मी-नारायणांची कृपा; चंद्र-केतू ग्रहण योग कुणाच्या फायद्याचा?

Published on -

वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशीचे वृत केले जाते. प्रत्येक महिन्यांत येणाऱ्या शुद्ध व वद्य पक्षातील एकादशीला वेगवेगळे महत्व असते. यावर्षी मे महिन्यांत 8 मे 2025 ला मोहिनी एकादशी आहे. विशेष म्हणजे या दिवशी आलेल्या एकादशीला अनेक योग जुळवून आले आहेत.

जुळवून आला ग्रहण योग

यावर्षी ग्रहांचा राजकुमार समजला जाणारा बुध ग्रह हा मेष राशीत आहे. रवी मेष राशीत, गुरु व हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, तर प्लुटो मकर राशीत आहे. याशिवाय शुक्र, शनि, नेपच्यून मीन राशीत आहेत. बुध व सूर्य यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग जुळवून आला आहे. तसेच चंद्र व केतुच्या युतीने ग्रहण योगही जुळून आला आहे.

कोणत्या राशींना होणार फायदा

1. मेष- या राशींच्या लोकांना आजचा दिवस खूप चांगला समजला जात आहे. नव्या ओळखीचे फायदे होतील. उत्साहाने सर्व कामे मार्गी लागतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळेल. नोकरीत असणाऱ्यांना पगारवाढ किंवा बढत मिळण्याचे योग आहेत. परीक्षा देणाऱ्यांनाही हा काळ चांगला आहे. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यावर व्यक्तिमत्तव उजळून निघेल. गुरुवार व शुक्रवारला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आाल आहे.

2. वृषभ- या राशीच्या लोकांनाही हा कालावधी शुभ आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला व्यवसायात तेजी येईल. नवीन प्रयोग करण्याचे मन होईल. जवळचा प्रवासही होईल. भावंडांच्या गाठीभेटी होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. जुनी येणी वसूल होतील. तुमच्या कलागुणांचे कौतूक होईल. मौजमजा करण्यावर पैसा खर्च होईल.

3.मिथुन- एखादी चांगली बातमी कानावर येईल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. अडकलेल्या कामांना गती मिळेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगली वेळ आहे. भेटवस्तू मिळेल. खाण्यापिण्याची चंगळ होईल. गुरुवार- शुक्रवार नोकरीचा ताण जाणवेल. घरात सबुरीने घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

4. कर्क- मनात नावीण्यपू्र्ण कल्पना विकसीत होतील. अडचणी दूर झआल्याने मनावरचा ताण कमी होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळून येतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. गुरुवार- शुक्रवार मोठी गुंतवणूक करताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

5. कन्या- चांगले यश मिळेल. भेटवस्तू मिळतील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. व्यवसायात मोठा फायदा होईल. पैसा खर्चही होईल. प्रेमात गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. मोहाच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवा. कुणावरही पटकन विश्वास ठेऊ नका.

6. तुळ- ग्रहमान चांगले आहे. सर्व ग्रहांची साथ मिळेल. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. कलागुणांचे कौतूक होईल. नोकरीत नव्या संघी चालून येतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. आपल्या कलागुणांना वाव द्याल. चंद्र भ्रमणाचे शुभ फळ मिळू शकते.

7. वृश्चिक- अनुकूल फळे मिळतील. पर्यटनाचा योग येईल. मौजमजा करण्यात वेळ घालवाल. नोकरीत अनुरूप बदल होईल. समाजाचा मानसन्मान वाढेल. आर्थिक आवक चांगली राहील. देवाणघेवाण करताना काळजी घ्या. शनिवारी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News