राशीभविष्य

Numerology: ‘या’ जन्मतारखांना जन्मलेले लोक असतात धैर्यवान आणि शूर, आयुष्यात करतात मोठी प्रगती! वाचा यात आहे का तुमची जन्मतारीख?

Published by
Ajay Patil

Numerology:- ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्माची तारीख, जन्मवेळ यावरून त्याची ग्रह दशा सांगितली जाते. त्याचप्रमाणे अंकशास्त्राचे महत्त्व देखील खूप महत्त्वाचे असून यामध्ये देखील व्यक्तीचा जन्मदिनांक आणि त्याच्या ज्या जन्मतारखेवरून निघणारा मुलांक  यावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व तसेच संबंधित व्यक्ती आयुष्यात कसे वागते किंवा किती प्रगती करते? इत्यादी बद्दलची महत्त्वाची माहिती दिलेली असते.

यामध्ये मुलांक हा खूप महत्त्वाचा असतो व जन्मतारखेवरून हा मुलांक काढता येतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर  जर 22 तारखेला जन्म झाला असेल तर 2+2=4 म्हणजेच 22 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक चार असतो.अशा पद्धतीने प्रत्येक जन्मतारखेवरून आपल्याला एक मुलांक काढता येतो.

या अनुषंगाने आपण या लेखामध्ये काही जन्मतारखाना जन्मलेल्या लोकांचे भविष्य कसे असते किंवा यांचे व्यक्तिमत्व कसे असते? याबद्दलची माहिती बघू.

 या जन्मतारखाना जन्मलेल्या लोकांचे आयुष्य कसे असते?

1- जन्मतारीख 1,9,10,28= या जन्म तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक एक असतो व एकचा अधिपती ग्रह सुर्य आहे. आपण अंकशास्त्रानुसार बघितले तर एक ही शक्तिशाली संख्या समजली जाते व कोणत्याही गोष्टीची सुरुवात एक नेच होते.

त्यामुळे कोणत्याही महिन्याच्या एक, दहा तसेच 19 किंवा 28 तारखेला जन्म झालेल्या लोकांमध्ये नैसर्गिक नेतृत्व गुण पाहायला मिळतात व ते कोणतेही अवघड काम अगदी सहजरीतीने पूर्ण करतात. तसेच या तारखांना जन्मलेले व्यक्ती राजकारण तसेच प्रशासनामध्ये देखील अव्वल ठरतात.

2- जन्मतारीख 3,12,21,30= या जन्म तारखेला जन्मलेले लोकांचा मुलांक तीन असतो व या तीन या संख्येचा शासक ग्रह गुरु आहे. तीन क्रमांकावर जन्मलेले लोक हे खूप स्वाभिमानी असतात

तसेच ते कुणासमोर कधी झुकत नाहीत व त्यांना ते आवडत देखील नाही. तसेच कुणाकडून उपकार करून घ्यायला देखील या लोकांना आवडत नाही. त्यांच्यामध्ये कुणाचा नको तो हस्तक्षेप देखील या लोकांना आवडत नाही.

3- जन्मतारीख 5,14,23= या जन्म तारखेला जन्म झालेल्या लोकांचा मुलांक पाच असतो व पाचचा शासक ग्रह बुध आहे. अंकशास्त्रानुसार बघितले तर पाच मुलांक असलेले लोक त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करतात व ते जे ही काम करतात ते खूप मनापासून करतात. हे लोक खूप धैर्यवान असतात व कोणतेही काम स्वतःहून करायला त्यांना खूप आवडते.

4- जन्मतारीख 9,18,27= या जन्म तारखांना जन्मलेल्या लोकांचा मुलांक नऊ असतो व या अंकावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. नऊ मुलांक असलेले लोक भावनिक तसेच धैर्यवान व शूरवीर असतात.

एवढंच नाही तर त्यांच्यामध्ये सर्जनशीलता हा गुण असतो व ते कल्पकवृत्तीचे देखील असतात. परंतु या मुलांकाचे व्यक्तींचे विचार सतत बदलत राहतात. परंतु हे दूरदर्शी देखील असतात व त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नेतृत्व गुण असतात.

Ajay Patil