आपल्याला माहित आहे की ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन त्यामुळे प्रत्येक राशीवर चांगला किंवा वाईट परिणाम हा होत असतो. तसेच प्रत्येक ग्रहाचा जो काही परिवर्तनाचा किंवा एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करण्याचा कालावधी आहे तो देखील वेगवेगळा असल्यामुळे प्रत्येक तीस दिवसांनी ग्रहांमध्ये काही स्वरूपामध्ये बदल होत असतो
व त्यामुळे त्याचा प्रभाव हा पूर्ण बारा राशींवर चांगल्या किंवा वाईट पद्धतीने आपल्याला दिसून येते. जर आपण ज्योतिष शास्त्रानुसार मार्च महिन्याचा विचार केला तर या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे सात मार्चला शुक्र व बुध कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार असून 14 मार्चला सूर्य मीन राशीत गोचर करणार आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे 18 तारखेला शनीदेवाचा उदय होणार आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा परिणाम हा राशींवर दिसून येणार आहे. त्यामुळे मार्च महिना मेष, मिथुन आणि कर्क राशींसाठी कसा जाईल? याबद्दलची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
या तीन राशींसाठी मार्च महिना कसा जाईल?
1-मेष– या राशीच्या व्यक्तींना 15 मार्चपर्यंत मंगळाचे उत्तम बळ मिळणार आहे व त्यामुळे धाडस व धैर्याची कामे पूर्ण करण्यास मदत होईल. तसेच गुरुबल चांगले असल्यामुळे मेष राशींचे व्यक्ती हिमतीने प्रगती करतील. तसेच विद्यार्थी वर्गाचा हा परीक्षेचा कालावधी असल्यामुळे त्यांना परीक्षा चांगला जातील.
मेष राशींच्या विद्यार्थ्यांनी शांतचित्ताने व एकाग्रतेने परीक्षेला सामोरे जावे. दिलेल्या अभ्यासाची रिविजन करत राहावी. त्यामुळे परीक्षेत खूप मोठा फायदा होणार आहे. नोकरदार किंवा व्यवसायिक व्यक्ती असतील तर त्यांनी त्यांची महत्त्वाची कामे या महिन्याच्या पूर्वार्धात पूर्ण करून घेणे फायद्याचे ठरेल.
अविवाहित व्यक्तींचे लग्न जमण्याची शक्यता आहे. भेटीगाठी यशस्वी ठरतील व कामानिमित्त लहान मोठा प्रवास घडेल.
2- मिथुन– मिथुन राशींच्या व्यक्तीसाठी मार्च महिन्यातील ग्रहमानाचे फळ संमिश्र स्वरूपाचे असणार आहे. या व्यक्तींच्या दशम स्थानातील राहू, बुध आणि नेपच्यून गुढ परिस्थिती निर्माण करतील. कुठल्याही पद्धतीने निर्णय घेताना गोंधळ उडताना दिसेल. मिथुन राशींचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी हा कसोटीचा कालावधी आहे.
नोकरी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल. काही डावपेच शिकायला मिळतील तसेच अनुभव तुम्हाला कामात येतील.
ज्या व्यक्तीचे लग्न झाले आहे त्यांचे त्यांच्या जोडीदारांसोबत काही रुसवेफुगवे असतील तर ते संवादाने दूर होतील. या महिन्यात नात्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे राहील. काही प्रमाणामध्ये पित्ताचे विकार दिसून आल्यास वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.
3- कर्क– कर्क राशींच्या व्यक्तींसाठी मार्च महिन्याचा विचार केला तर या महिन्यांमध्ये बोलण्यात स्पष्टता असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लोकांकडून काढला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे खबरदारी घ्यावी. कुटुंबामध्ये काही समस्या उद्भवल्या तर चर्चेने ते सोडवण्याला प्राधान्य द्यावे.
त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. त्यामुळे कुठलीही पळवाट न शोधता आजचे यश तुम्हाला आयुष्यभर साथ देणारे ठरणार आहे. नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी धोरणी विचार कराल व त्यामुळे तुमचे आणि इतरांचे देखील हितसंबंध जोपासला जाईल व त्यासाठीचा तुमचा प्रयत्न असेल.
तुमच्या जोडीदाराच्या काही अपेक्षा पूर्ण करताना तुम्हाला दमछाक होईल. परंतु तुमचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे तुम्ही काहीही करण्याची तयारी दाखवल.गुंतवणूकदार व्यक्तींनी या महिन्याच्या शेवटी मोठी जोखीम घेऊ नये.
(टीप– वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. याविषयी कुठल्याही प्रकारचा दावा आम्ही करत नाहीत.)