राशीभविष्य

काय सांगता ! व्यक्तीच्या पायाच्या बोटावरून कळतो त्याचा स्वभाव, पायाच्या अंगठ्यावरून कसा ओळखणार समोरच्याचा स्वभाव ?

Published by
Tejas B Shelar

Samudrik Shastra : भारतात ज्योतिष शास्त्राला मानणाऱ्या लोकांची संख्या फारच अधिक आहे. ज्योतिषी आपल्या हातावर असणाऱ्या रेषा पाहून आपले भविष्य सांगत असतो. दुसरीकडे, अंक ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या केवळ जन्मतारखेवरून त्याचे संपूर्ण भविष्य, त्याचा स्वभाव अशा सर्वच गोष्टींचा उलगडा केला जातो.

मात्र, तुम्ही कधी व्यक्तीचे नाक, डोळे, उंची, हाताचे बोट, पायाचे बोट म्हणजेच व्यक्तीच्या शारीरिक जडणघडणवरून आपले भविष्य सांगणारे व्यक्ती पाहिलेत का ? खरेतर आपल्या शरीरावरून आपल्या स्वभावाचा अंदाज बांधता येतो.

सामुद्रिक शास्त्रात तसे वर्णन आहे. सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीच्या पायाच्या अंगठ्यावरून त्याचा स्वभाव कसा असू शकतो ? याबाबतही डिटेल माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आता आपण याच संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

पायाच्या बोटावरून कसा कळणार स्वभाव

अंगठा वाकडा असला : तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांचा अंगठा हा वाकडा असतो. मात्र ज्या लोकांचा पायाचा अंगठा वाकडा असतो असे लोक खूपच उच्च विचाराचे असतात. या लोकांकडे नेहमीच इतर लोक सल्ले घेण्यासाठी येतात. हे लोक कोणताही निर्णय झटपट घेत नाहीत.

निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची सखोल चौकशी करणे हे या लोकांच्या अंगात भिनलेले असते. विचार करून निर्णय घेणे ही या लोकांची सर्वात मोठी खासियत. मात्र या लोकांचा स्वभाव खूपच संवेदनशील असतो.

पायाचा अंगठा इतर बोटांपेक्षा मोठा असेल तर : सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या व्यक्तीचा पायाचा अंगठा हा त्याच्या इतर बोटांपेक्षा मोठा असेल तर असे लोक खूपच अट्रॅक्टिव्ह असतात. अशी व्यक्ती इतरांची मने जिंकण्यात पटाईत असते. हे लोक नेहमीच नवनवीन गोष्टी शिकत असतात.

यांना नवीन गोष्टी शिकण्याची आवड असते. हे लोक तुम्हाला नेहमीच क्रिएटिव्ह फिल्ड मध्ये पाहायला मिळतील. एक्टिंग, लिखाण, पेंटिंग किंवा यांसारख्या इतर अनेक क्रिएटिव्ह फिल्ड मध्ये तुम्हाला असे लोक सहजतेने पाहायला मिळतील.

पायाचा अंगठा सरळ असेल तर : पायाचा अंगठा जर सरळ असेल तर असे लोक खूपच शिस्तबद्ध असल्याचे आढळून आले आहे. नियमांचे पालन करणारे हे लोक इतरांनाही नियमांचे पालन करा असा सल्ला देतात. या लोकांचं व्यक्तिमत्व आणि स्वभाव खूपच साधा असतो आणि यांना वाकड्यात जाणं आवडत नाही.

तर्जनी व अंगठ्याची उंची एकसमान असल्यास : असे लोक प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात. हे लोक खूपच उत्साही असतात. जवळपास सर्वच गोष्टींकडे हे लोक उत्साहाने पाहतात. नवीन व्यक्तींना भेटणं, प्रवास करणे हे या लोकांचे आवडते छंद आणि हे छंद जोपासण्यात हे लोक पटाईत देखील असतात.

पहिल्या बोटापेक्षा अंगठा लहान असल्यास : अशा व्यक्तींना एकांतात राहणे विशेष प्रिय असते. इतरांशी बोलणं, इतरांसोबत भेटणं मैत्री करण अशा लोकांना फारस आवडत नाही. असे लोक खूपच बुद्धीवाण असतात. या लोकांना जवळपास सर्वच गोष्टींचे ज्ञान असते. सर्वच गोष्टींची माहिती जाणून घेण्याची या लोकांना उत्सुकता असते आणि असे लोक यामुळे ज्ञानी बनतात. या लोकांना समाजात मोठा मान सन्मान असतो.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar