Samudrik Shastra Prediction : वैदिक ज्योतिष शास्त्रात ग्रह आणि त्यांच्या चालीनुसार व्यक्तीचे भविष्य पाहिले जात असते. व्यक्तीच्या कुंडलीत असणाऱ्या ग्रहांच्या स्थितीवरून सदर व्यक्तीचे भविष्य वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले जात असते. अंक ज्योतिष शास्त्रानुसार फक्त व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचे भविष्य कसे असू शकते, त्याचे व्यक्तिमत्व कसे असू शकते याचा अंदाज बांधला जातो.
तसेच सामुद्रिक शास्त्रानुसार आपल्या शरीराच्या जडणघडणानुसार व्यक्तीचा स्वभाव, त्याचे भविष्य, लग्न, पैसा, बुद्धी अशा विविध गोष्टींचा अंदाज लावता येणे शक्य आहे. खरे तर सामुद्रिक शास्त्र आणि अंक ज्योतिष हे ज्योतिष शास्त्राचेच भाग आहेत. दरम्यान आज आपण सामुद्रिक शास्त्राच्या एका महत्त्वाच्या बाबीची माहिती पाहणार आहोत.
सामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीच्या पायाच्या आकारावरून आणि तळव्यावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव कसा असू शकतो याची कल्पना येत असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा फक्त पाय बघूनच आपण त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव ओळखू शकतो. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया सामुद्रिक शास्त्रात दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहिती विषयी.
लहान पाय असणारे लोक : ज्या लोकांचे पाय छोटे असतात अशा लोकांना कोणासोबतही मोकळेपणाने बोलणे आणि भेटणे आवडत नाही. असे लोक आपल्या कामात आनंदी असतात. स्वतःमध्ये आनंद शोधता. अशा लोकांना विविध वस्तूंची खरेदी करणे आवडते. तुम्ही जेव्हाही असे लोक कुठे पाहाल तर ते तुम्हाला खरेदी करतानाच दिसतील.
सपाट पावली लोक : जर तुम्ही सपाट पावली अर्थातच ज्या लोकांचे तळवे सपाट असतात त्यांच्याविषयी काही चुकीचे गैरसमज तुमच्या मनात तयार केलेले असतील तर ते गैरसमज दूर करा. कारण की, सामुद्रिक शास्त्र असे म्हणते की, ज्या लोकांचे तळवे सपाट असतात म्हणजे सपाट पावली लोक खूपच मेहनती असतात.
विशेष म्हणजे हे लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर 100 आणि 101% यश मिळवतात. तसेच या लोकांचा स्वभाव खूपच रॉयल असतो, हे लोक लय भारी स्वभावाचे, अगदीचं मनमोकळे असतात. असे लोक कुणाला भीत नाहीत आणि स्पष्टवक्ते असतात. म्हणजे त्यांना जे काही बोलायचं असेल ते तोंडावर बोलतात, मागेपुढे बोलणे या लोकांना आवडत नाही.
नरम अन मांसल पाय असणारे : काही लोकांचे पाय खूपच मांसल अन नरम असतात. पण, असे लोक खूपच संकोचाने भरलेले असतात आणि कोणाशीही बोलणे त्यांना त्रासदायक वाटते. अशा लोकांच्या चेहऱ्यावर नेहमीच दुःख पाहायला मिळते. पण त्यांचे हे दुःखद रुपडं लोकांना आवडत नाही.
उंच पाय असणारे लोक : काही लोकांचे तळवे हे खालून थोडे वर आलेले असतात म्हणजे सपाट नसतात. असे लोक देखील खूपच मेहनती आणि हुशार असतात. या लोकांची एक मोठी विशेषता अशी की ते स्वप्न पाहतात पण जे काही त्यांच्या आयुष्यात असते त्यामध्ये ते समाधानी असतात.
म्हणजेच माझ्या आयुष्यात अमुक गोष्ट नाहीये म्हणून ते नाराज नसतात. थोडक्यात देवाने त्यांना जेवढे दिलं आहे तेवढ्यात ते समाधानी असतात, खऱ्या अर्थाने या लोकांची ही एक मोठी विशेषता आहे. आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी कसे राहायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक असते.