Surya shani yuti 2024 : 2023 वर्ष संपत आलं आहे, काही दिवसांतच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. 2024 हे वर्ष लवकर सुरु होणार आहे. या नवीन वर्षाच्या संदर्भात प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत असतील, त्यांचे नवीन वर्ष कसे असेल? कोणत्या राशीवर कोणता ग्रह परिणाम करेल? 2023 प्रमाणेच 2024 मध्ये देखील ग्रहांची मोठी हालचाल होणार आहे. ज्याचा मानवी जीवनावर चांगला आणि वाईट परिणाम दिसून येणार आहे.
वर्षाच्या सुरुवातीला ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि न्यायदेवता शनिदेव यांची भेट होईल. या दोन ग्रहांचे नाते पिता-पुत्राचे आहे, परंतु तरीही ते एकमेकांचे शत्रू मानले जातात. या दोन ग्रहांच्या संयोगाचा परिणाम कोणत्या राशींवर होईल हे जाणून घेऊया….
सूर्य आणि शनीचे संक्रमण ‘या’ राशींवर करेल परिणाम !
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी शनि आणि सूर्याचे मिलन हानिकारक मानले जात आहे, यांच्या संयोगाचा कन्या राशीच्या चिन्हावर वाईट परिणाम होऊ शकतो. कन्या राशीच्या लोकांच्या संक्रमण कुंडलीच्या सहाव्या भावात हा संयोग होणार आहे. त्यामुळे न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. जास्त खर्चाचा बोजा वाढू शकतो.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचा संयोग अत्यंत हानिकारक आहे. कन्या राशीच्या आठव्या भावात हा संयोग तयार होणार आहे. या काळात वैवाहिक जीवनात मतभेद वाढू शकतात, नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक शनीच्या प्रभावाखाली असतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचा संयोग खूप वाईट काळ आणू शकतो. मीन राशीच्या 12 व्या घरात हा संयोग तयार होणार आहे, त्यामुळे जास्त खर्च टाळा. तुम्हाला या काळात आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. कोणी काही खोटे आरोप देखील करू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना नुकसान होऊ शकते. जास्त सावधगिरी बाळगा.