राशीभविष्य

नवीन वर्षाची सुरुवात ‘या’ 3 राशींचे बदलवणार नशीब! नोकरी-व्यवसायात होईल प्रगती आणि मिळेल भरपूर पैसा

Published by
Ajay Patil

Horoscope In January 2025:- सध्या डिसेंबर महिना सुरू असून हा 2024 या वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि आता काही दिवसांनी 2025 या वर्षाचे आगमन होईल व याची उत्सुकता बऱ्याच जणांना लागून राहिलेली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताला आता काही दिवस बाकी राहिले असून तरुणांपासून तर प्रौढांपर्यंत अनेकजण आता यासाठी सज्ज देखील आहेत.

परंतु ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर हे नवीन वर्ष काही राशीकरिता खूप फलदायी आणि भाग्याचे असे ठरणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र आणि राहू हे दोन ग्रह खूप महत्त्वपूर्ण मानले जातात व या दोन्ही ग्रहांचे राशी परिवर्तन म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राशीत हे ग्रह प्रवेश करतात तेव्हा त्याचा परिणाम बारा राशींवर चांगला किंवा वाईट या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो.

अशा परिस्थितीमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर 2025 या वर्षाच्या सुरुवातीला शुक्र मीन राशिमध्ये प्रवेश करणार आहे व याच राशीत आधीपासूनच राहू विराजमान आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती होणार असून ही युती तीन राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

नवीन वर्षात होणारी राहू आणि शुक्राची युती या तीन राशीकरिता ठरेल फायद्याची

1- तुळ राशी- शुक्र आणि राहूची युती तूळ राशीच्या व्यक्तींकरिता खूप फायदा देणारी ठरणार आहे. या काळात जर पैसे अडकलेले असतील तर ते मिळण्यास मदत होणार आहे व या राशींचे व्यक्ती या कालावधीत आध्यात्मिक कार्यामध्ये देखील सहभागी होणार आहेत.

इतकेच नाहीतर मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील व तणाव दूर होण्यास मदत होईल. परंतु राशींच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये देखील चांगले यश मिळेल व अनेक सुख सुविधा देखील मिळतील.

आरोग्य ठणठणीत राहील व प्रेम संबंध असतील तर ते देखील चांगले होतील. या कालावधीत तुळ राशींचे व्यक्ती कुठलेही काम करतील तेव्हा त्यांना कुटुंबाचे साथ यामध्ये मिळेल. व्यवसायामध्ये देखील अचानक धनलाभ होईल व दूरचे प्रवास घडेल.

2- वृश्चिक राशी- नवीन वर्षामध्ये होणारी राहू आणि शुक्राची युती ही या राशींच्या व्यक्तींकरिता देखील फायदा देणारी ठरणार आहे. या कालावधीमध्ये आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येतील व आयुष्यात सुख समृद्धी वाढण्यास मदत होईल. कुठेही गुंतवणूक कराल तरी फायदा मिळेल व जोडीदाराकडून देखील आनंदी वार्ता कानी पडेल.

नोकरीत असाल तर प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. या कालावधीत आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहिल व कुटुंबामध्ये आनंदी आनंदाचे वातावरण राहील.

समाजामध्ये मानसन्मान वाढीस लागेल व सगळीकडे तुमचेच वर्चस्व असेल. जे अविवाहित असतील त्यांच्याकरिता लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील चांगले यश मिळेल व आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल.

3- कर्क राशी- शुक्र आणि राहूची युती या राशीच्या व्यक्तींकरिता देखील फलदायी सिद्ध होणार आहे. मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील व नशिबाची पुरेपूर साथ या कालावधीत मिळेल. तसेच कर्क राशीचे व्यक्ती या कालावधीत नवीन वाहन किंवा घर तसेच जमिनीची खरेदी करू शकतात.

कुटुंबामध्ये काही वाद असतील तर ते मिटतील व कुटुंबात शांततेचे वातावरण पाहायला मिळेल. जे व्यक्ती नोकरी करत असतील त्यांची पगारवाढ होईल व काही ठिकाणी पैसे अडकलेले असतील तर ते मिळण्यास मदत होईल. गुंतवणुकीतून देखील फायदा मिळेल व व्यवसाय करणाऱ्यांना चांगला धनलाभ होईल व आरोग्य देखील ठणठणीत राहील.

( टीप- वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती वाचकांकरिता माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीचे अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचे समर्थन अथवा या माहितीविषयी दावा करत नाही.)

Ajay Patil