राशीभविष्य

कोणत्याही महिन्याच्या 18, 27 आणि 9 तारखेला जन्म झालेल्या लोकांसाठी 2025 वर्ष कसे असेल? काय आहे या जन्मतारखांचा 2025 या वर्षांशी संबंध?

Published by
Ajay Patil

Numerology:- ज्योतिषशास्त्राला हिंदू धर्मामध्ये खूप मोठे महत्त्व असून जीवनातील बऱ्याच गोष्टींवर ज्योतिषशास्त्राचा प्रभाव पडतो.आपल्याला माहित आहे की एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल तर आपण शुभ मुहूर्तावर करतो व अशा प्रकारचा शुभ मुहूर्त देखील आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारेच बघतो व त्याप्रमाणे एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात किंवा नवीन वाहन किंवा इतर खरेदी करत असतो.

अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्र हे देखील एक महत्त्वाचे शास्त्र असून ज्योतिष शास्त्र इतकेच भारतीय परंपरेमध्ये अंकशास्त्राला महत्त्व आहे. आपल्याला माहित आहे की,अंकशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख व त्यावरून निघणारा त्याचा मुलांक इत्यादी वरून संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्व किंवा स्वभाव आणि त्याचे भविष्य वर्तवले जाते.

त्यामुळे अंकशास्त्राला देखील तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे आपण या लेखात अंकशास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा जन्म 9, 27 आणि 18 तारखेला झालेला आहे त्या व्यक्तींसाठी हे येणारे 2025 हे वर्ष कसे असेल आणि 2025 आणि नऊ या मुलांकाचा किंवा वर दिलेल्या तारखांचा नेमका काय संबंध आहे? बद्दलची माहिती थोडक्यात बघणार आहोत.

अंकशास्त्रानुसार 9 या अंकाचे महत्त्व काय आहे?
कोणत्याही महिन्याच्या नऊ, 18 आणि 27 तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला आहे त्या लोकांचा मुलांक हा अंकशास्त्रानुसार नऊ आहे. अंकशास्त्रानुसार बघितले तर नऊ हा अंक परोपकार आणि माणुसकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असा मानला जातो. इतकेच नाहीतर या अंकाला आध्यात्मिक जागरूकता आणि ज्ञानाचे प्रतीक म्हणून देखील ओळखले जाते.

हिंदू धर्मानुसार नऊ हा अंक नवदुर्गा आणि नवरात्री यांच्याशी कनेक्ट आहे.इतकेच नाही तर हा अंक नवग्रहाची स्थिती देखील दाखवतो. या सगळ्या परिस्थितीमुळे नऊ हा अंक खूप शुभ असा मानला जातो. बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून बघितले तर या अंकाला खूप महत्त्व आहे.

बौद्ध धर्मामध्ये नऊ या अंकाला ज्ञान आणि करूणा याचे प्रतीक असे म्हटले जाते व इतकेच नाहीतर सहस्रार चक्राचे प्रतीक म्हणून देखील हा अंक ओळखला जातो. त्यामुळे कोणत्याही महिन्याच्या 18 आणि 27 व 9 या तारखांना जन्म झालेले लोक हे आरोग्य तसेच सेवा व कला क्षेत्रामध्ये खूप यशस्वी होतात व प्रचंड प्रमाणात नाव कमवतात.

या सगळ्या कारणांमुळे जर आपण बघितले तर या तारखांना जन्म झालेल्या लोकांसाठी हे येणारे वर्ष खूप महत्त्वाचे आणि सकारात्मक असणार आहे.

येणाऱ्या या 2025 वर्षांमध्ये 18, 27 आणि नऊ या तारखांना जन्मलेले लोक खूप यशस्वी होणार आहेत आणि करिअरमध्ये देखील त्यांना खूप मोठा बदल पाहायला मिळणार आहे.

9 या अंकाचा 2025 शी काय आहे संबंध?
अंकशास्त्रानुसार बघितले तर नऊ या अंकाचा 2025 या वर्षाशी थेट संबंध आहे. कारण 2025 या वर्षाच्या सर्व अंकांची बेरीज केली तर नऊ येते.

परिस्थिती जर अंकशास्त्रानुसार आपण बघितले तर जेव्हा वर्षाची एकूण संख्या नऊ असते तेव्हा ते वर्ष स्वतः एक खास बनते. तसेच ते वर्ष पूर्ण त्याचे प्रतीक मानले जाते व या दृष्टिकोनातून नऊ मुलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष खूप शुभ व फलदायी ठरणार आहे.

Ajay Patil