राशीभविष्य

मंगळाची उलटी चाल ‘या’ राशींसाठी ठरेल नुकसानदायक? डिसेंबर महिन्यापासून होऊ शकते पैसे आणि इतर बाबतीत नुकसान

Published by
Ajay Patil

Mangal Vakri Chaal 2024:- ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांचा व्यक्तीच्या जीवनावर पडणारा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम या बद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळते. ज्योतिषशास्त्राला भारतीय परंपरेमध्ये खूप महत्त्व असून आजही अनेक महत्त्वाची कामे शुभ मुहूर्तावर केली जातात व हा मूहुर्त ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनच काढला जातो.

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचे गोचर म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीतील प्रवेशामुळे राशींवर पडणारा प्रभाव याची देखील माहिती आपल्याला मिळते व त्या दृष्टिकोनातून ज्योतिष शास्त्राला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार जर आपण बघितले तर सात डिसेंबर रोजी मंगळ ग्रह कर्क राशीत वक्री होणारा आहे व या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये मंगळ वक्री चाल चालणार असून त्याचा नकारात्मक परिणाम काही राशींवर होणार आहे. नेमक्या मंगळाच्या या स्थितीमुळे कोणत्या राशींचे नुकसान होऊ शकते याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.

मंगळाची उलटी चाल या राशीसाठी ठरेल नुकसानदायक

1-वृषभ राशी- मंगळाची उलटी चाल या राशींच्या व्यक्तींसाठी खूप नुकसान देणारी ठरू शकते. या कालावधीमध्ये प्रवास केला तर अडचणी निर्माण होऊ शकतात व काही गोष्टी आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो.

नातेसंबंधांमध्ये काही गोष्टींना धरून गैरसमज वाढू शकतात. नोकरी करत असलेल्या व्यक्तींसाठी नोकरीमध्ये बदलीचे संकेत असून व्यवसायात असाल तरी कष्टाचे फळ पूर्ण मिळणार नाही. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

2- मिथुन राशी- मंगळाची उलटी चाल मिथुन राशींच्या व्यक्तींकरिता देखील खूप अडचणीचे ठरू शकते. या कालावधीत आर्थिक स्थिती कमकुवत होण्याची शक्यता आहे आणि कर्जाचा डोंगर देखील वाढू शकतो. कुटुंबामध्ये भांडणे होऊ शकतात आणि करिअरमध्ये देखील अडचणी उद्भवू शकतात.

व्यवसाय करत असाल तर अनेक नवीन योजना तुम्हाला बनवाव्या लागतील. खर्चात वाढ होऊ शकते आणि जोडीदाराबरोबरच्या नात्यात देखील ताण तणाव निर्माण होऊ शकतो. या कालावधीत डोळे आणि दातांच्या समस्या उद्भवू शकतात व त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

3- मेष राशी- मंगळाच्या उलट्या चालीमुळे या राशींच्या व्यक्तींच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो व घरामध्ये ताण-तणाव वाढू शकतो. इतकेच नाहीतर घरामध्ये सुख सुविधांचा अभाव जाणवेल.

करिअरमध्ये देखील अडचणी उद्भवू शकतात व सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. व्यवसाय करत असाल तर नुकसान होण्याची शक्यता असल्याने खर्च वाढू शकतो. या कालावधीत पाठदुखी आणि फुफुसाच्या समस्या उद्भवू शकतात व त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

4- कुंभ राशी- मंगळाच्या या चालीमुळे कुंभ राशींच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. कष्टाला यश मिळेल परंतु मन आतून समाधानी राहणार नाही. नोकरी करत असाल तर ती बदलण्याचा विचार येऊ शकतो.

पार्टनरशिप मध्ये जर एखादा व्यवसाय करत असाल तर पार्टनरशिप तुटण्याची शक्यता आहे आणि खर्चात वाढ होऊ शकते. या कालावधीत एलर्जी किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात व त्यामुळे आरोग्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

5- सिंह राशी- मंगळाच्या उलट्या चालीमुळे सिंह राशींच्या लोकांना काळजी घेण्याची खूप गरज आहे.या कालावधीत नोकरी करणारे नोकरी बदलू शकतात व नशीब तुमच्या बाजूने कमी असल्यामुळे व्यवसायात देखील नुकसान होऊ शकते.

मानसिक तणाव वाढू शकतो. या कालावधीत प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. तसेच पाय आणि सांधेदुखीच्या समस्या वाढू शकतात व त्यामुळे आरोग्य देखील सांभाळावे.

(टीप- वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीचे अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचे समर्थन किंवा दावा करत नाही.)

Ajay Patil