Samudrik Shastra:- ज्योतिष शास्त्र, अंकशास्त्र तसेच हस्तरेषा शास्त्र हे खूप महत्त्वाचे शास्त्र असून ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे व्यक्तीचा जन्म दिनांक किंवा जन्म वेळ यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याचे पुढील आयुष्य सांगता येते तसेच हस्तरेषाशास्त्रामध्ये तळहाताच्या रेषांच्या स्वरूप समोर ठेवून त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा त्यांचे आयुष्य कसे राहील याबाबत भविष्य वर्तवले जाते व तसेच अंकशास्त्रामध्ये देखील व्यक्तीच्या मुलांकावरून त्या व्यक्तीचे भविष्य वर्तवले जाते.
अगदी त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्र देखील एक यामध्ये महत्त्वपूर्ण असे शास्त्र असून यामध्ये तुम्ही व्यक्तीच्या काही शरीराच्या भागांवरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज लावू शकतात. कारण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा आकार हा वेगवेगळा असतो
व यामध्ये जर आपण ओठांचा विचार केला तर काही व्यक्तींचे ओठ बारीक किंवा पातळ असतात तर काही व्यक्तींचे ओठ जाड असतात. या अशाप्रकारे ओठांच्या आकारावरून तुम्ही समुद्रिक शास्त्राचा आधार घेऊन समोरचा व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व किंवा त्याचा स्वभाव जाणून घेऊ शकतात.
व्यक्तीच्या ओठांवरून ओळखा स्वभाव
1- मोठे ओठांचे व्यक्ती– जर आपण समुद्रिक शास्त्रानुसार बघितले तर मोठे ओठ असलेले लोक अतिशय वैभवशाली जीवन जगत असतात व विलासी व चैनीच्या वस्तूंचे ते खूप शौकीन असतात. कामामध्ये देखील ते अतिशय चपखल असतात व त्या लोकांना प्रवास करायला खूप आवडतो.
कोणासोबत पटकन ते मैत्री करायला पुढे सरसावतात आणि त्यांची मैत्री देखील जमते. या लोकांमध्ये नेतृत्व गुण खूप मोठ्या प्रमाणावर असतो व ते नेतृत्व करण्यामध्ये पारंगत देखील असतात. हे लोक बोलायला खूप फटकळ असतात म्हणजेच ते उघडपणे बोलत असतात.
2- बारीक ओठांचे व्यक्ती– सामुद्रिक शास्त्रानुसार बघितले तर ज्या लोकांचे ओठ बारीक आणि स्लिम असतात ते खूप संवेदनशील असतात व व्यवसाय तसेच करिअरच्या बाबतीत सावधगिरीची भूमिका बाळगून असतात.
बारीक ओठ असलेल्या लोकांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात व विशेष म्हणजे हे व्यक्ती दिसायला देखील आकर्षक असतात व प्रामाणिक असतात. बारीक ओठ असलेले व्यक्ती व्यवसायामध्ये खूप प्रगती करतात व विनोदी स्वभावाचे असतात.
3- जाड ओठांचे व्यक्ती– समुद्र शास्त्रानुसार ज्या महिलेचे वरचे ओठ जाड असतात त्या खूप महत्त्वाकांक्षी असतात व कशामध्ये काहीतरी उच्चतम किंवा मोठे करण्याचा त्यांचा कायम विचार असतो. एवढेच नाही तर या महिला एकट्याने जीवन जगण्याचा विचार करत असतात
व अशा महिलांना गर्दीच्या ठिकाणी जाणे मुळीच आवडत नाही. जाड ओठ असलेल्या महिला या जीवनामध्ये अतिशय आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना तशी सवय असते. म्हणजे अशा व्यक्तींना इतरांच्या जीवनाशी किंवा आयुष्याची काहीही देणं घेणं नसते.